Next
राज्य सरकारच्या हजार दिवसांनिमित्त ‘भाजयुमो’चा पंचसूत्री कार्यक्रम
प्रेस रिलीज
Thursday, July 27, 2017 | 11:04 AM
15 0 0
Share this article:

योगेश टिळेकरमुंबई : ‘महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार येत्या ३० जुलै २०१७ रोजी आपले एक हजार दिवस यशस्वीपणे पूर्ण करत आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चातर्फे पंचसूत्री` कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आहे,’ अशी माहिती ‘भाजयुमो’चे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी दिली.

महाराष्ट्रातील भाजप सरकार लोकहिताचे अनेक निर्णय सातत्याने घेत आहे. ते निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी युवा मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ‘भाजयुमो’चे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली या पंचसुत्री` कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

‘या पंचसूत्री` कार्यक्रमाच्या माध्यमातून एक हजार दिवस युवा सरकारचे, घे भरारी, युवा महाराष्ट्र युवा सरकार, कॉलेज कनेक्ट, खेलो भारत अशा पाच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक मंडल व जिल्हा स्तरावरती यशस्वी होण्यासाठी युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी व प्रभारी नियोजन करीत आहेत. या पंचसूत्री` कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील युवक, युवती, विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने ‘भाजयुमो’शी जोडण्याचा प्रयत्न राहणार आहे,’ असे टिळेकर म्हणाले.

देवेंद्र फडणवीसपंचसूत्री कार्यक्रमाविषयी

१००० दिवस युवा सरकारचे
- महाराष्ट्रातील भाजप सरकारला एक हजार दिवस पूर्ण होतील. या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व पंचायत  समिती गणांमध्ये व प्रभागांमध्ये युवा मोर्चातर्फे अभियानप्रमुख नेमून, त्या ठिकाणी ‘भाजयुमो’च्या शाखेचे उद्घाटन, नामफलकाचे अनावरण व सरकारच्या कामाची माहिती देणारे प्रेझेंटेशन केले जाईल.
- महाराष्ट्रात साधारण १० हजार नामफलकांचे अनावरण होईल. असा सात दिवसांचा कार्यक्रम करण्यात येईल.
- मुख्यमंत्र्यांचा जनतेसाठीचा संदेश असलेला व्हिडिओ तयार करून तो या कार्यक्रमांच्या माध्यमातून दाखवला जाईल. तसेच सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जाईल.
- हा कार्यक्रम ३० जुलै ते सहा ऑगस्ट या कालावधीदरम्यान होणार आहे.
- या कार्यक्रमाची सुरुवात प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत टिळेकर आणि सर्व प्रदेश पदाधिकारी दौरा करतील. ते सर्व पंचायत समिती गण आणि नगरपंचायत/नगरपालिका/महानगरपालिका क्षेत्रांतील प्रभागांमध्ये युवा मोर्चाच्या शाखांचे उद्घाटन, नामफलकांचे अनावरण आणि सरकारच्या योजनांविषयी जनजागृती करून माहिती देणे आदी कार्यक्रम करणार आहेत.

कॉलेज कनेक्ट
- सरकारने विद्यार्थ्यांसाठी घेतलेला ‘ईबीसी’ची मर्यादा सहा लाखांपर्यंत वाढविण्याचा ऐतिहासिक निर्णय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यक्रम केला जाणार आहे.
- अभियांत्रिकी प्रवेशाची महाराष्ट्रातील सर्व केंद्रे व इतर महाविद्यालये यामध्ये भाजमुयो कार्यक्रम करणार आहे.
- ईबीसी सवलतीमध्ये सहा लाखांपर्यंतची मर्यादा वाढ, वसतिगृहातील प्रवेशासंबंधातील आर्थिक लाभ थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार, ज्यांना वसतिगृह उपलब्ध झाले नाही त्यांनाही सवलतीचा आर्थिक लाभ मिळणार, यासाठी सरकारने केलेल्या राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना व पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वतंत्र या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

घे भरारी

- महाराष्ट्रातील भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या १८ ते ४० या वयोगटातील युवतींचे एकदिवसीय महाअधिवेशन करण्यात येणार आहे.
- त्यांचा सत्कार करून त्यांना महाराष्ट्रातील कामकाजाच्या संधींविषयी माहिती दिली जाणार आहे.
- अनेक उत्तम वक्त्यांच्या माध्यमातून युवतींना पुढील वाटचालीत भरारी घेण्यासाठी प्रेरित केले जाणार आहे.
- या युवती आपापल्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त युवतींना पक्ष संघटनेशी जोडू शकतील यासाठीचा हा प्रयत्न आहे.
- ‘भाजयुमो’ला युवती मोठ्या संख्येने जोडल्या जातील, यासाठीचे प्रयत्न या उपक्रमातून केले जाणार आहेत.

युवा महाराष्ट्र, युवा सरकार
- महाराष्ट्रातील भाजपतर्फे निवडून आलेल्या १८ ते ४० वयोगटातील सर्व युवा लोकप्रतिनिधींचे विभागीय अधिवेशन करण्यात येणार आहे.
- उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा पाचही विभागांमध्ये हे अधिवेशन होईल.
- युवा लोकप्रतिनिधींकडून असलेल्या अपेक्षा, त्यांच्यासाठी कामाच्या असलेल्या संधी व युवा मोर्चाच्या वाढीसाठी त्यांचे योगदान अशा अनेक विषयांवर आधारित सत्रे या अधिवेशनात घेतली जातील.
- या अधिवेशनानंतर युवा लोकप्रतिनिधींनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमधील, तसेच इतर युवकांना सरकारी योजनांच्या माध्यमातून आकर्षित करणे व युवकांची ताकद पक्ष संघनेच्या मागे उभी करणे हे अपेक्षित आहे.
- या अधिवेशनांच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर युवा मोर्चाला विशेष ताकद मिळेल अशी अपेक्षा आहे.

 खेलो भारत
- या कार्यक्रमाच्या माध्यमातून खो-खो, कबड्डी, मल्लखांब, कुस्ती, रस्सीखेच अशा खेळांचे सामने तालुका, जिल्हा स्तरावर खेळवले जाणार असून, त्यातील युवक व युवतींचे विजयी संघ महाराष्ट्रस्तरीय सामने खेळतील व त्यातील विजयी संघांना राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळेल. राष्ट्रीय सामन्यांमधून विजयी संघाचा सन्मान ‘भाजयुमो’च्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत केला जाणार आहे.

वरील विशेष पंचसूत्री` कार्यक्रमांच्या माध्यमातून युवा मोर्चाचे कार्य तळागाळापर्यंत पोहचावे, महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक युवक ‘भाजयुमो’शी जोडले जावेत व सरकारच्या जनतेसाठीच्या लोककल्याणकारी निर्णयांमध्ये हातभार लावण्यासाठी युवकांनी सहभागी व्हावे, अशा अपेक्षेने युवा मोर्चाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या माध्यमातून अनेक लोककल्याणकारी योजना तयार होत आहेत. जनतेच्या प्रत्यक्ष सहभागाशिवाय सर्वांगीण विकास शक्य नसतो आणि म्हणूनच जनतेने विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हावे व युवा मोर्चाने त्यासाठी विशेष प्रयत्न करावेत,’ असे आवाहन प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search