Next
कोंडगाव येथे अकौंटन्सीचे मोफत मार्गदर्शन वर्ग
BOI
Friday, May 11 | 11:12 AM
15 0 0
Share this story

कोंडगाव (साखरपा) : येथील श्रीराम देवस्थान आणि रत्नागिरी येथील उज्ज्वला अकौंटन्सी क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी मे महिन्यात कोंडगाव श्रीराम मंदिरात कॉमर्स शाखेबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

उज्ज्वला अकौंटन्सी क्लासेसचे संस्थापक, अकौंटन्सीविषयावर उत्तम प्रभुत्त्व असलेले आणि अनेक वर्षे हा क्लास चालवून रत्नागिरीकरांच्या मनात मानाचे स्थान मिळवणारे बाळकृष्ण जयराम हळबे हे स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शन वर्गांसाठी यावर्षी दहावीची देऊन पुढील वर्षी अकरावी वाणिज्य (कॉमर्स) शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी, तसेच प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थी उपस्थित राहू शकतात.  

कॉमर्समधील यशाचे मार्ग, पुढील करियर करताना कॉमर्समध्ये असलेले नवीन नवीन मार्ग, अभ्यास करतानाच्या सोप्या युक्त्या, अश्या अनेक सध्या परंतु महत्त्वाच्या गोष्टींचे मार्गदर्शन हळबे सर दिवसातून एक आणि सलग १५ दिवस करणार आहेत. हे मार्गदर्शन वर्ग कोकणातील मुलांसाठी मोफत असणार आहेत.

‘साखरपा परिसरातील इच्छुक विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन वर्गांचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा,’ असे आवाहन श्रीराम देवस्थानचे अमित केतकर आणि आयोजकांनी केले आहे.

नाव नोंदणीसाठी संपर्क :
विनोद केतकर : ९४२११ ८८९१७
कांचन जोगळेकर : ९४२०० ५०६००
अमित केतकर : ९४२११ ३८४५०
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link