Next
‘ससून रुग्णालय बनतेय सामान्यांचा आधार’
प्रेस रिलीज
Wednesday, May 16, 2018 | 12:52 PM
15 0 0
Share this story

दंतचिकित्सा उपकरणांची पाहणी करताना दीपा द्वारकादास, अॅड. जनक द्वारकादास, डॉ. विवेक पाखमोडे, रितू छाब्रिया, गायत्री छाब्रिया, मनीषा जेठा, मनीष जेठा, डॉ. समीर खैरे, डॉ. प्रणव पाटील आदी.

पुणे : ‘ससून सर्वोपचार रुग्णालयाला समाजातील अनेक दानशूर व्यक्तींकडून अर्थसहाय मिळत आहे. त्यातून ससून रुग्णालयातील उपचार अत्याधुनिक होत आहेत. सर्वसामान्यांना परवडतील अशा अनेक शस्त्रक्रिया येथे होऊ लागल्या आहेत. त्यामुळे ‘ससून फॉर कॉमन मॅन’ ही संकल्पना प्रत्यक्षात येत असून, सामान्यांसाठी ससून रुग्णालय आधार बनत आहे,’ असे प्रतिपादन ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी केले.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनतर्फे मुंबईतील प्रसिद्ध वकील दीपा व जनक द्वारकादास यांनी दिलेल्या १० लाख रुपयांच्या देणगीतून ससून रुग्णालयात आधुनिक लेसर मशीनद्वारे दांतरोपण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या अत्याधुनिक दंतचिकित्सा विभागाच्या उद्घाटनावेळी डॉ. चंदनवाले बोलत होते. या प्रसंगी दीपा द्वारकादास, अॅड. जनक द्वारकादास, दंत चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. विवेक पाखमोडे, ‘मुकुल माधव’च्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया, गायत्री छाब्रिया, मनीषा जेठा, मनीष जेठा, डॉ. समीर खैरे, डॉ. प्रणव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

दंतचिकित्सा विभागाचे उद्घाटन करताना अॅड. जनक द्वारकादास व इतर मान्यवरडॉ. चंदनवाले म्हणाले, ‘समाजातील अनेक दानशूर त्यांचा ‘सीएसआर’ ‘ससून’च्या आधुनिकीकरणासाठी देऊ लागले आहेत. त्यामुळे ‘ससून’मध्ये अनेक महत्त्वाच्या शस्त्रक्रिया, तसेच आधुनिक उपचार उपलब्ध होत आहेत. देणग्यांचा हा ओघ असाच चालू राहिला, तर येत्या काळात सर्वसामान्यांना अल्पदरात सर्व प्रकारचे उपचार मिळतील. ससून रुग्णालय अधिकाधिक लोकाभिमुख आणि लोकप्रिय होईल.’

रितू छाब्रिया म्हणाल्या, ‘मुकुल माधव फाउंडेशनतर्फे पहिल्या टप्प्यात ही लेसर मशीन सुविधा उभारण्यात आली आहे. यामध्ये तीन डेंटल चेअर्स, लेसर आणि इम्प्लांट मशीन, अत्याधुनिक लूप या गोष्टी आहेत. पुढील टप्प्यात आणखी आधुनिक उपकरणे बसविण्यात येणार आहेत. गेल्या तीन वर्षांपासून नवजात शिशु अतिदक्षता विभाग, एन्डोक्रोनॉलॉजी विभाग व रुग्णाच्या नातेवाईकांसाठी विश्रांती कक्ष अशा विविध सुविधांद्वारे सामान्य नागरिकांना मिळणारे उपचार समाधानकारक आहेत.’

अॅड. द्वारकादास म्हणाले, ‘ससून रुग्णालय आणि मुकुल माधव फाउंडेशन यांनी केलेल्या कामावर प्रभावित होऊन ही देणगी दिली आहे. आपला पैसा सामान्यांच्या उपचारासाठी सत्कारणी लागला याचे समाधान आहे. भविष्यात आणखी मदत करण्याचा प्रयत्न राहील.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link