Next
झटपट बनवा
BOI
Tuesday, April 09, 2019 | 10:03 AM
15 0 0
Share this article:

नवनवीन पदार्थ करण्याची हौस अनेक महिलांना असते. कमी वेळात, कमी खर्चात रुचकर पदार्थ तयार करणे हे कोणाला नको असते? अशा पदार्थांच्या कृती प्रभा पुरुषोत्तम प्रभुणे यांनी ‘झटपट बनवा’ पुस्तकामधून दिल्या आहेत. घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामधून हे पदार्थ तयार होणारे आहेत. उपवासाच्या विभागात फ्रूट पंच, तुळशीच्या बियांचे सरबत, विविध फळांचे रस, कुल्फी, आइस्क्रीम अशा गारेगार पदार्थांसह लोणची, चटण्या, सार, कोशिंबीर, उपवासाच्या भाज्या, पोळ्या, भाकऱ्या, पुऱ्या, थालीपीठ, वडे व भजी, डोसा, इडली, पॅटीस, कटलेट, चिवडा, शेव, गोडाचे पदार्थ आदींचा समावेश आहे. इतर पदार्थांमध्ये ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या, कुरडईचा चिवडा, औषधी लोणचे, शेंगोळे, भरली भाकरी, आंबोळी, काकडीचे पातोळे, मूग-मटार सामोसे, चवळीचे मुठीये, कोबीच्या वड्या, तिखी भाकरी, खाकऱ्याचा भुगा, रोटला, राजस्थानी गट्टे, झुणझुण्या, तिकडीमाँ, पंचमेळ डाळ, तांदळाच्या पिठाची कडबोळी, उपरपेंडी, पेंडवटण, हुरड्याची उसळ, फणसाचे काप, राधा बल्लवी अशा वैविध्यपूर्ण पदार्थांच्या पाककृतींचा समावेश आहे.

पुस्तक : झटपट बनवा

लेखिका : प्रभा पुरुषोत्तम प्रभुणे

प्रकाशक : सुकृत प्रकाशन, पुणे

पृष्ठे : ११८

मूल्य : १६० रुपये

(‘झटपट बनवा’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search