Next
आशियातील सर्वांत मोठे रबर प्रदर्शन मुंबईत
प्रेस रिलीज
Wednesday, June 13, 2018 | 01:29 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘इंडिया रबर एक्स्पो २०१९’(आयआरइ) हे आशियातील सर्वांत मोठे दहावे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद मुंबईमधल्या बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित केली जाणार असून ते विकास, आदानप्रदान आणि सहयोगासाठी उत्तम मंच ठरणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ऑल इंडिया रबर इंडस्ट्रिज असोसिएशन या १९४५मध्ये स्थापना झालेल्या देशातील सर्वात जुन्या प्रिमियर इंडस्ट्रिज असोसिएशनमार्फत होणार आहे.

ऑल इंडिया रबर इंडस्ट्रिज असोसिएशनची स्थापना भारतीय रबर उद्योगाचे संरक्षण करणे आणि त्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने झाली होती. आज ही संस्था बाराशेहून अधिक सक्रिय सभासदांसोबत विस्तीर्ण संबंधासोबत उद्योगाचा आवाज बनली आहे.  

‘इंडिया रबर एक्स्पो २०१९’ आंतरराष्ट्रीय मानकांना पूर्ण करण्याकडे, जगभरातील औद्योगिक व्यावसायिकांचे इंडिया रबर एक्स्पो, मुंबई येथे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. भारतीय कंपन्यांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सहयोग करण्यासाठी आगळावेगळा मंच मिळत आहे. विकसित होणाऱ्या रबर उद्योगाचा अंगभूत भाग म्हणून आयआरइ रबर उद्योगातल्या भारताच्या दुसऱ्या सर्वात जलद गतीने प्रगती करणाऱ्या अर्थकारणाचे स्पष्ट निदर्शक आहे. आयआरइ रबर उद्योगातल्या अत्याधुनिक तांत्रिक प्रगतींचे प्रदर्शन करेल आणि आरँएँडडी व दर्जा नियंत्रणाच्या बाजारपेठेतील सद्य स्थिती, सुविधा आणि सेवांबद्दल माहिती देणार आहे. रबर उद्योगासंबंधीच्या शासनाच्या बदलत्या नियमांबद्दल आणि नियंत्रणाबद्दल सूचना मिळत राहण्याची ही एक चांगली संधी असेल.  

आयआरइ भारतातील १५ शहरांमध्ये ‘इंडिया रबर एक्स्पो २०१९’ला प्रोत्साहन देण्यासाठी रोड शोचे आयोजन करत आहे. हा रोड शो अहमदाबादपासून सुरू होऊन देशातील १५ शहरांमध्ये फिरून जागरुकता निर्माण करणार आहे आणि या एक्स्पोमध्ये अधिकाधिक लोकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. हा रोड शो एका मंचावर औद्योगिक व्यावसायिकांना एकत्र आणण्याचा एक उत्तम मार्ग आहे जिथे ते नवनवीन समाधानांसह येऊन नवीन व्यवसाय संधी शोधू शकतील आणि बदलत्या बाजारपेठ ट्रेंड्सबद्दल बोलू शकतील.

‘आयआरइ २०१९’चे अध्यक्ष आणि ओरिएंटल रबर इंडस्ट्रिज प्रा.लि.चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विक्रम मकार यांनी सर्वप्रथम आयआरइची प्रगती आणि विस्तारण पाहिला होता. याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘या एक्स्पोमध्ये उद्योगातील नामवंत संस्था एकाच ठिकाणी संम्मिलित होणार आहेत. यामुळे लहान आणि मोठ्या रबर व्यवसायिकांना नेटवर्क तयार करण्याची आणि संकल्पनांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळणार आहे. तयार बाजारपेठ आणि अतिरिक्त गुणविशेषांसोबत भारतात या क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व आहे मग ती तयार बाजारपेठ असो, संस्थात्मक संरचना आणि अगदी विस्तीर्ण भौतिक संसाधने असोत. भारतातील औद्योगिक संरचना प्रदर्शित केल्या जाणाऱ्या पुढील विकसित पिढीच्या उत्पादन तंत्रज्ञानाची हमखास ग्राहक आहे.’

तीनशेच्या आसपास संख्येने प्रदर्शक २६ हजार चौरस मीटरहून जास्त क्षेत्रफळ असलेल्या प्रदर्शन भागात आपले स्टॉल लावणार आहेत. इंडिया रबर एक्स्पो आपल्या दहाव्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेचे आयोजन करण्यासाठी सज्ज असून, हा अतिशय प्रसिद्ध सोहळा आहे. यामार्फत रबर व्यावसायिकांना भेटण्यासाठी आणि रबर उद्योगातील वर्तमान आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय ट्रेंड्स तसेच नवमतांबद्दल चर्चा करण्याचा हा सर्वात मोठा मंच ठरणार आहे. या व्यतिरिक्त आयआरइ खरेदीकर्ता आणि विक्रेत्यांना रबर उद्योगातील काही नामवंतांना भेटण्याची संधी देणार आहे.  

‘’आयआरइ २०१९’चे चिफ कन्वेयर विष्णू भीमराजका यांचा रबर बाजारपेठेच्या भक्कमपणावर ठाम विश्वास आहे आणि ते ‘आयआरइ’च्या पहिल्या एंडोसर्सपैकी एक आहेत. त्यांच्या मते, ‘इंडिया रबर एक्सपो (आयआरइ)२१०९ उद्योगातील अग्रणींना एकत्र आणण्याचा एक उत्तम सोहळा आहे. या अभूतपूर्व उपक्रमामुळे उद्योगातील व्यवसायिकांना संकल्पना आणि तांत्रिक प्रगतीचे आदानप्रदान करण्यासाठी मंच मिळेल आणि त्यामुळे आगामी काळात देशाच्या आवश्यकता पूर्ण केल्या जाऊ शकतील. या प्रदर्शनामार्फत व्यापारउदिमाला सामाजिक, आर्थिक विकासात रूपांतरित करण्यासाठी भारतीय अर्थकारणाचे बहुदिशाभिमुख स्वरूप आणि मेक इन इंडिया अभियान पहायला मिळणार आहे.’

‘भारतीय रबर विकासाच्या कथेला आता प्रमाणीकरणाची आवश्यकता नाही कारण भारत आता जागतिक स्तरावर सर्वात मोठे रबर केंद्र बनण्यासाठी सुसज्ज होत आहे. येत्या काळात या वेगाने प्रगतीपथावर मार्गक्रमण करणारा उद्योग आपल्या अभूतपूर्व विकास आयामाला भव्यदिव्यतेने साकारणार आहे,’ असे ऑल इंडिया रबर इंडस्ट्रिज असोसिशनचे प्रेसिडेंट कमल चौधरी म्हणाले.  

‘हे प्रदर्शन संकल्पना, नवीनता आणि जगाच्या कॅन्वासवर साकारल्या जाणाऱ्या उत्पादनांचे माहेरघर होते, ज्यायोगे नवीन उद्योजक आणि डिझाइन निर्मात्यांसाठी एक मोठी संरचना तयार केली गेली होती. तुम्हा सर्वांच्या सहयोगाने येणाऱ्या काळात आम्ही अशी अनेक प्रदर्शने आयोजित करण्याचे उद्देश्य समोर ठेवत आहोत,’ असे असोसिअशनचे उपाध्यक्ष व्ही. टी. चंद्रशेखर यांनी सांगितले.   

असोसिअशनचे नॅशनल कन्वेनर उमेश ध्रुव म्हणाले की, ‘या प्रदर्शनामुळे विविध कंपन्यांना त्यांच्या उत्पादन नैपुण्यांना एकाच ठिकाणी प्रदर्शित करण्याची संधी मिळणार आहे. प्रदर्शनाला चालना देण्यासाठी सर्व उत्पादकांना मंच उपलब्ध करुन देणे आणि राष्ट्राच्या अर्थयंत्रणेत योगदान देणे हा आमचा उद्देश आहे.’

असोसिएशनचे चेअरमन (डब्ल्यूआर) विनोद बन्सल म्हणाले, ‘अधिकाधिक नवीनतम उपाय उपलब्ध करून देण्याच्या आणि विकासासाठी सहभागी होण्यासाठी पोषक वातावरण तयार करण्याच्या उद्देशाने, आम्ही रबर उत्पादकांना ‘इंडियन रबर एक्स्पो २०१९’ होण्यासाठी प्रोत्साहित करीत आहोत आणि देशाच्या प्रगतीची अपेक्षा करीत आहोत.’

‘इंडियन रबर एक्स्पो’बद्दल :
इंडिया रबर एक्स्पो हा आशियाचा सर्वात मोठा रबर एक्स्पो आहे. २००१मध्ये त्याच्या आरंभापासून तो आज भारतातील रबर उद्योगाला अपूर्व संधी मिळवून देणाऱ्या कार्यक्रमांपैकी एक आहे. आता दहावे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद मुंबईमधल्या बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित केली जाणार असून तो विकास, आदानप्रदान आणि सहयोगासाठी उत्तम मंच ठरणार आहे.

‘आयआरइ’ भारतीय कंपन्यांना परदेशी कंपन्यांसोबत भेट घेण्याची आणि सहयोग करण्याची आगळीवेगळी संधी देत आहे. विकसित होणाऱ्या रबर उद्योगाचा अंगभूत भाग म्हणून ‘आयआरइ’ रबर उद्योगातल्या भारताच्या दुसऱ्या सर्वात जलद गतीने भरभराट होणाऱ्या अर्थकारणाचे स्पष्ट निदर्शक आहे. आपल्या स्थापनेपासून एक दशकाहून जास्त काळ प्रगती करणारा इंडिया रबर एक्स्पो २००१मधल्या केवळ तीन हजार चौरस मीटरवरून २०१९मध्ये २६ हजार चौरस मीटर एवढ्या भव्यतेपर्यंत वाढला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search