Next
‘पुरुषोत्तम’ची नांदी
BOI
Tuesday, August 08, 2017 | 07:14 PM
15 0 0
Share this article:

एमएम लॉ महाविद्यालयातील विद्यार्थी तालीम करताना.
महाविद्यालयीन नाट्यवर्तुळात मानाची समजली जाणारी पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आज, आठ ऑगस्टपासून सुरू होत आहे. या स्पर्धेचे हे यंदाचे ५३वे वर्ष आहे. त्यामुळे कॉलेजांमधील उत्साह ओसंडून वाहत आहे. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दररोज या स्पर्धेचे वार्तांकन केले जाणार असून, स्पर्धेची पूर्वपीठिका मांडणारा हा लेख...
..............
 
पुणे हे जसे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते, तशीच पुण्याची ओळख इथल्या सांस्कृतिक वातावरणासाठीदेखील आहे. पुण्याने आजवर देशाला अनेक उत्तमोत्तम कलाकार, संगीतकार, गायक, वादक दिलेले आहेत.  पुण्याला कलाकारांची भट्टी म्हटले, तरी वावगे ठरणार नाही.  असेच कलाकार घडविणारे एक व्यासपीठ म्हणजे – पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा. सतीश आळेकर, सुबोध भावे, प्रवीण तरडे यांच्यासारख्या नामवंत कलाकारांसोबतच, आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधी असलेले अमेय वाघ, अभय महाजन, पर्ण पेठे, शिवराज वायचळ हेही ‘पुरुषोत्तम’च्याच तालमीत तयार झालेले कलाकार आहेत. अशी अनेक कलाकारांची नावे सांगता येतील.

एमएम लॉ महाविद्यालयातील विद्यार्थी तालीम करताना.‘पुरुषोत्तम करंडक’ म्हटले, की पुण्याच्याच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्रातील नाट्यप्रेमींच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते.  जवळपास ५० वर्षांहूनही जास्त मोठा इतिहास असलेली ही एकांकिका स्पर्धा आहे.  १९६३ साली सुरू झालेली ही स्पर्धा आजपर्यंत अखंडितपणे सुरू आहे.  विशेष म्हणजे इतक्या वर्षांच्या काळात कधीच तिला मिळणारा प्रतिसाद कमी झालेला नाही,  उलट तो वर्षानुवर्षे वाढतच चालला आहे. त्याचीच परिणती म्हणून की काय, सुरुवातीला फक्त पुण्यात होणाऱ्या या स्पर्धेची केंद्रे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या अन्य शहरांमध्येही सुरू करण्यात आली. त्यामुळे आता ही स्पर्धा पुण्याव्यतिरिक्त कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव, नागपूर या शहरांमध्येही घेतली जाते.  स्पर्धेचा पहिला टप्पा पुण्यात पार पडल्यानंतर इतर शहरांमधील स्पर्धा घेण्यात येते.  त्यानंतर, महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरील स्पर्धा पार पडल्यानंतर पुण्यातच डिसेंबर महिन्यात सर्व केंद्रांवरील विजेत्यांच्यासहभागाने महाकरंडक फेरी घेण्यात येते.  महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्था या स्पर्धेचे आयोजन करते.

चिन्मय टिपणीसस्पर्धेबाबत बोलताना मॉडर्न कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी दिग्दर्शक चिन्मय टिपणीस म्हणाला, ‘यंदा आम्ही जोमाने तयारी करत आहोत.  नाटक तयार आहे; पण मागील वर्षी फिरोदिया करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलो असल्याने यंदा लोकांच्या आमच्याकडून असलेल्या अपेक्षाही वाढल्या आहेत. त्यामुळे आम्ही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा व करंडक जिंकण्याचा प्रयत्न करू.’ 

आज, म्हणजेच आठ ऑगस्टपासून २३ ऑगस्टपर्यंत दररोज सायंकाळी पाच ते आठ या वेळेत ही स्पर्धा पुण्यातील भरत नाट्यमंदिरात चालणार असल्याने, ‘भरत’ला उत्सवाचे स्वरूप येणार आहे.  आपल्या महाविद्यालयासाठी पुरुषोत्तम करंडक जिंकण्याची कामगिरी करणे हीच तिथे जमलेल्या प्रत्येकाची इच्छा आणि ध्येय आहे. 

आठ ऑगस्टला, पहिल्या दिवशी पुण्यातील ‘व्हीआयटी’ची ‘वेध,’ ‘कमिन्स महाविद्यालया’ची ‘साकव’ आणि अहमदनगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाची ‘ड्रायव्हर’ ही एकांकिका सादर होणार आहे.

- आकाश गुळाणकर

(‘पुरुषोत्तम करंडक’मधील यंदाच्या एकांकिकांबद्दलचे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील वार्तांकन वाचण्यासाठी इथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search