Next
ठाणे डाक विभागाच्या सर्व शाखा डाकघरांचा महामेळावा
BOI
Monday, February 11, 2019 | 11:31 AM
15 0 0
Share this story



ठाणे : डाक विभागातर्फे ठाणे विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व शाखा डाक घरांचा महामेळावा ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालय येथे नऊ फेब्रुवारी २०१९ रोजी उत्साहात झाला. या वेळी नवी मुंबई क्षेत्राच्या पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या मेळाव्यात सर्व प्रकारची ११ हजार नवीन खातीउघडली गेली. तसेच सहा कोटींचे आरपीएलआय, पीएलआय प्रस्ताव काढले गेले. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने या महामेळाव्याचे आयोजन केले होते. डाक विभागाच्या सर्व योजनांची माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आली होती. या प्रसंगी पोस्ट मास्टर जनरल मधाळे यांनी सर्वांशी संवाद साधला.

या महामेळाव्याच्या निमित्ताने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राष्ट्रीय पातळीवर सर्वांत जास्त खाती मिळवून देणाऱ्या खुटघर शाखेच्या डाकपाल नूतन बसवंत यांचा सत्कार करण्यात आला; तसेच दहा हजार रुपये रोख बक्षीस म्हणून देण्यात आले. त्याचप्रमाणे पोस्ट खात्याला सर्वांत जास्त खाती व विमा रक्कम मिळवून देणाऱ्या शाखा डाकपालांचा सत्कारही या वेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला शाखा डाकपाल, डाक वितरक व पोस्टमास्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link