Next
क्रीडामहर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी बाळासाहेब साने
BOI
Wednesday, July 10, 2019 | 05:06 PM
15 0 0
Share this article:

पुणे : क्रीडामहर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी बाळासाहेब साने यांची निवड झाली आहे. प्रतिष्ठानच्या कार्यवाहपदी सुनील नेवरेकर यांची तर खजिनदारपदी डॉ. आरती दातार यांची निवड झाली आहे. 

नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये पुढील चार वर्षांसाठी नवीन कार्यकारणी निवडण्यात आली. कार्यकारणीच्या सदस्यपदी उल्हासदादा पवार, अंकुश काकडे, डॉ. सतीश देसाई, संजय गोखले, आशिष केसकर, सूर्यकांत पाठक यांची निवड झाली आहे.
 
प्रतिष्ठानच्या वतीने दर वर्षी क्रीडामहर्षी हरिभाऊ साने यांच्या स्मरणार्थ कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात येते;तसेच क्रीडाविषयक चर्चासत्रे, क्रीडास्पर्धा आदींचे आयोजन करण्यात येते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search