Next
राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात ‘पुरुषोत्तम’चा विशेष शो
प्रेस रिलीज
Monday, May 13, 2019 | 05:49 PM
15 0 0
Share this article:


पुणे : औरंगाबाद महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या प्रशासकीय कामगिरीवर आधारित ‘पुरुषोत्तम’ हा मराठी चित्रपट १० मे २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. पुणे येथे राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या कोथरूड येथील मिनी थिएटरमध्ये ११ मे रोजी दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पुरुषोत्तम’च्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी दिग्दर्शिका रिमा अमरापूरकर, अभिनेत्री देविका दप्तरदार, केतकी अमरापूरकर, पूजा पवार, अभिनेते नंदू माधव, उमेश घेवरीकर, देवीप्रसाद सोहोनी, दीप्ती घोडके, भगवान राऊत, सुहास लहासे, सहायक दिग्दर्शिका भाग्यश्री राऊत आदी उपस्थित होते. 

या प्रसंगी बोलताना रिमा अमरापूरकर म्हणाल्या, ‘लोकहिताची कामे करणाऱ्या प्रामाणिक व कर्तव्य दक्ष प्रशासकीय अधिकाऱ्यांचे काम जनतेसमोर यावे या हेतूने संवेदना फिल्म फाउंडेशन व आदर्श ग्रुप निर्मित, श्रीमती सुनंदा अमरापूरकर प्रस्तुत ‘पुरुषोत्तम’ हा चित्रपट सर्व जनतेने चित्रपटगृहात जाऊन पाहावा.’

‘पुरुषोत्तम’च्या माध्यमातून तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची भूमिका मी या चित्रपटात साकारली आहे. आपल्याच मातीतील, आपल्याच माणसांची कामगिरी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचे व ‘पुरुषोत्तम’च्या टीमला पाठबळ देण्याचे आवाहन नंदू माधव यांनी या वेळी केले.

जेष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी ‘पुरुषोत्तम’चे भरभरून कौतुक केले. यावेळी सुनील सुकथनकर, सुनील महाजन, प्रा. मंगेश जोशी, शांभवी जोशी, दिग्दर्शक मिलिंद लेले, डॉ. अनिल अवचट यांच्यासह पुण्यातील साहित्य, कला, क्रीडा, नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search