Next
पुण्यात प्रथमच ‘ख्रिसमस कार्निव्हल’
प्रेस रिलीज
Wednesday, December 06 | 05:05 PM
15 0 0
Share this story

​पत्रकार परिषदेत ​माहिती देताना ​कार्निव्हलचे प्रमुख आयोजक रेव्हरंड चंद्रशेखर जाधव आणि ‘मेथडिस्ट मराठी चर्च’चे सचिव अ‍ॅड. मार्कस देशमुख.पुणे : ख्रिसमसच्या पार्श्‍वभूमीवर ‘मेथडिस्ट मराठी चर्च’तर्फे पुण्यात प्रथमच ‘​ख्रिसमस कार्निव्हल’चे आयोजन केले आहे. ‘जगातील शांतता’ ही कार्निव्हलची थीम असून, ​ख्रिसमस उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यासाठी यात विविध उपक्रम आयोजित केले आहेत, अशी माहिती ​कार्निव्हलचे प्रमुख आयोजक रेव्हरंड चंद्रशेखर जाधव आणि ‘मेथडिस्ट मराठी चर्च’चे सचिव अ‍ॅड. मार्कस देशमुख यांनी दिली.

श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हा कार्निव्हल सर्वांसाठी खुला असून, यात पुण्यातील विविध संस्था सहभागी होणार आहेत. हचिंग्स हायस्कूल, ​सेंट हेलेना स्कूल या ​​आंतरराष्ट्रीय स्तरातील प्रार्थना स्थळातील गायक-वादक मंडळी ​ख्रिसमस कॅरोल्स सादर करतील; तसेच श्री. रॉय हे व्हॉयलीन आणि श्री. टेरेंन्स हे शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत नृत्य सादर करणार आहेत.

‘कार्निव्हलमध्ये सौंदर्य स्पर्धा आणि ‘लेसर शो’ हे विशेष आकर्षण असणार आहे. योग, फिटनेस, एरोबिक्स, झुंबाच्या कार्यशाळा तसेच विविध खेळ, फूड स्टॉल असणार आहेत,’ असे अ‍ॅड. देशमुख यांनी सांगितले.

​​​कार्निव्हलविषयी :

दिवस : आठ ते १० डिसेंबर २०१७
वेळ : सकाळी ११ ते रात्री १०
स्थळ : गोळीबार मैदान, शंकरशेठ रोड, पुणे
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link