Next
नावीन्यपूर्ण कलाकृतींचे ‘डेझिनो-२०१९’ प्रदर्शन सुरू
सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम
BOI
Monday, April 15, 2019 | 04:07 PM
15 0 0
Share this article:


पुणे : वृत्तपत्रांपासून साकारलेला सोफासेट व फर्निचर, टाकाऊ कागदापासून उभारलेला सेल्फी पॉईंट, अरबी समुद्रातील नियोजित शिवस्मारकाची प्रतिकृती, पेपरपासून  तयार केलेल्या भिंती, घराच्या आतील सजावटीचे साहित्य अशा असंख्य नावीन्यपूर्ण आणि कलात्मक डिझाइन्स पुणेकरांना ‘डेझिनो-२०१९’ या प्रदर्शनात पहायला मिळत आहेत. २२० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला आहे.


सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनच्या विद्यार्थ्यांनी पॅरामेट्रिक संकल्पनेवर तयार केलेल्या इंटेरिअर डिझाइन्सचे हे प्रदर्शन घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा कलादालनात भरले आहे. रविवारी, १४ एप्रिल रोजी या प्रदर्शनाचे  उद्घाटन झाले. या वेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील सहायक अधिकारी संतोष वामन, आर्किटेक्ट प्रिया गोखले, महेश बांगड, सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज धोका, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया,  उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, प्राचार्य अजित शिंदे, विभागप्रमुख मंदार दिवाने, गीता दीक्षित, प्रा. अपूर्वा ठोसर, भूपेश गर्ग, दिशा कुचेकर, विद्यार्थी प्रतिनिधी संकल्प सोनी आदी मान्यवर उपस्थित होते. 


सोमवार, १५ एप्रिल आणि मंगळवार, १६ एप्रिल असे दोन दिवस हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. या दोन दिवशी सकाळी १० ते रात्री आठ या वेळेत सर्वांना हे प्रदर्शन पाहता येणार आहे.

सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज धोका, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया आदी मान्यवर प्रदर्शन पहात असताना.

या प्रदर्शनात कागद, फोमबोर्ड, मॅट्रिक्स, फॅब्रिक, जिओमॅट्रिक्स, टाकाऊ वस्तू यासह विविध नैसर्गिक वस्तूंच्या वापरातून ही डिझाइन्स साकारली आहेत. एकूण ३५ इंटेरिअर डिझाइन्स मॉडेल्स, १६ पॅनल मॉडेल्स, ९८२ डिझाईन शीट्स, थ्रीडी मॉडेल्स आणि मुलांनी काढलेली असंख्य चित्रे मांडण्यात आली आहेत. 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि अभियंता मित्र मासिकाचे संपादक डॉ. कमलाकांत वडेलकर यांनीही प्रदर्शनाला भेट देत, विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे कौतुक केले.


डॉ. संजय चोरडिया म्हणाले, ‘अतिशय कलात्मक डिझाइन्स विद्यार्थ्यांनी साकारली आहेत. त्यांच्यातील कलेला वाव देण्यासाठी अशा इंटिरिअर डिझाइन्सचे प्रदर्शन दर वर्षी भरविण्यात येते. त्यातून त्यांना प्रात्यक्षिक अनुभव मिळतो. अनेक कलाकृती या प्रथमच पाहायला मिळाल्या आहेत. समाजासमोर असलेल्या समस्या शोधून त्यावर उपाय शोधण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना विकसित कराव्यात. आपली कलाकृती उत्कृष्ट कशी आहे, हे सांगण्याचे कौशल्य आत्मसात करावे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sakina Abbas Docter About 96 Days ago
Excellent
0
0
Pranay Palande About 98 Days ago
Brilliant Creativity Awesome exhibition.
0
0

Select Language
Share Link
 
Search