Next
अमृता विश्वविद्यापीठमला ‘इंजिएनएक्स’मध्ये जेतेपद
प्रेस रिलीज
Thursday, September 06, 2018 | 12:53 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या आयटी क्षेत्रातील अग्रेसर सेवापुरवठादार व व्यापार सोल्यूशन कंपनीने ३१ ऑगस्ट रोजी इंजिनीअरिंग फॉर नेक्स्ट जनरेशन (इंजिएनएक्स) या त्यांच्या इंजिनीअरिंग व आयओटी आव्‍हानात्मक स्पर्धेच्या सहाव्या सत्राचे आयोजन केले होते. मुंबईलगत ठाणे येथील ऑलिम्पस सेंटर येथे ही स्पर्धा पार पडली.

यंदाच्या वर्षी ‘डिजिटल ट्विन’ ही थीम देण्यात आली होती. स्पर्धेत देशातल्या एक हजार ६०० शिक्षण संस्थांतील ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आठ हजार ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या विविध फेऱ्यांमध्ये सहभाग घेतला आणि निवडक संघांना ठराविक उत्पादनाची, प्रक्रियेची वा सिस्टीमची डिजिटल ट्विन म्हणजेच आवृत्ती बनवण्याची संधी देण्यात आली. त्यासाठी स्मार्ट उत्पादन, स्मार्ट परिसंस्था, स्मार्ट दळणवळण, स्मार्ट उपकरणे आणि स्मार्ट आरोग्य या क्षेत्रांतून उत्पादने निवडण्यात आली.

दोन चुरशीच्या फेऱ्यांनंतर पाच संघांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली. अंतिम सादरीकरणादरम्यान सर्व संघांना आपली डिजिटल आवृत्तीची निर्मिती त्या उत्पादनाच्या भौतिक रूपासह, डिजिटल सिस्टीम व अल्गोरिदमसकट सादर करायची होती. परीक्षकांनी सर्व सादरीकरणे पारखून विजेत्यांची नावे घोषित केली. यात टीम व्हिजन- अमृता विश्वविद्यापीठम (कोईंबतूर– स्मार्ट उत्पादन), पीएसजीआयटेक-२ पीएसजी आयटेक (कोईंबतूर– स्मार्ट उपकरणे) आणि नेताजी सुभाष इंजिनीअरिंग कॉलेज (कोलकाता– स्मार्ट परिसंस्था) यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले.

प्रतन विजेत्याला पाच लाख रोख, द्वितीय पारितोषिक विजेत्यांना दोन लाख ५० हजार, तर तृतीय पारितोषिक विजेत्यांना एक लाख रोख रकमेचे बक्षीस देण्यात आले. सर्व अंतिम फेरीतील विजेत्यांना अभियांत्रिकी पदवी पूर्ण केल्यानंतर ‘टीसीएस’तर्फे नोकरीची संधीही देण्यात येणार आहे.

या वेळी बोलताना कंपनीच्या आयओटी आणि इंजिनीअरिंग आणि औद्योगिक सेवा विभागाचे उपाध्यक्ष रेगू अय्यस्वामी म्हणाले, ‘टीसीएसच्या ‘इंजिएनएक्स’च्या प्रत्येक वर्षाच्या सत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा शोध लावण्याची संधी दिली जात असून, डिजिटल ट्विनची संकल्पना आम्ही सादर केल्याने यंदाचे वर्षही काही वेगळे झाले नाही. आयओटीमुळे तरुण अभियंत्यांना तांत्रिक-सामाजिक संशोधने आजच्या डिजिटल काळात साकारणे सहज शक्य होते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमधील स्पर्धात्मकता आणि उदयोन्मुख क्षेत्रांतील गुणवत्ता जगासमोर आली आहे.’

‘इंजिएनएक्स’ ही ‘टीसीएस’ची प्रमुख स्पर्धा असून, इंजिनीरिंग आणि डिझाइन क्षेत्रातील संशोधनाला या स्पर्धेतून प्रोत्साहन दिले जाते. यातून उदयोन्मुख अभियंत्यांना खऱ्या आयुष्यातील समस्या कशा सोडवाव्यात, त्यासाठी आयओटीसारख्या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, याविषयी प्रेरणा मिळते. टीसीएसच्या गुणवत्ता शोध धोरणाचा या स्पर्धा म्हणजे एक भाग असून यात टेस्टीमनी, हॅकक्वेस्ट आणि कोडव्हिटा या अन्य स्पर्धांचाही समावेश आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search