Next
‘पीव्हीआर’मध्ये ‘स्नॉवेल’चा ऑडिओ शो प्रीमियर
प्रेस रिलीज
Wednesday, May 16, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this storyपुणे : ऑडिओबुक्स आणि श्राव्य माध्यमामध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारे स्नॉवेल आता ‘ती परत येईल?’ या मूळ रोमांचक गूढकथेसह एका नाविन्यपूर्ण पद्धतीने आपल्‍या समोर आले असून, एका वेगळ्याच प्रकारचा श्राव्य अनुभव देण्यासाठी ‘स्नॉवेल’ने भारतात प्रथमच याप्रकारच्या ऑडिओ शोच्या प्रीमियरचे आयोजन केले होते.

डॉ. गिरीश ओक यांचा प्रमुख आवाज असलेल्‍या या कथेचे लेखक शिरीष देखणे असून, अंजली कुलकर्णी यांनी याचे दिग्‍दर्शन केले आहे. श्राव्य माध्यमासाठी ही कथा खास करून लिहिण्यात आली आहे. दुसर्‍या महायुद्धाची पार्श्वभूमी असलेल्‍या या कथेचे कथानक सुयोग्‍य श्राव्य अनुभवासाठी अनेक अनपेक्षित वळणे घेत श्रोत्‍यांना खुर्चीला खिळवून ठेवते.

रारंग ढांग, प्रेषित, वनवास, समुद्र, सत्यजित राय यांच्या कथा, कुमाऊँचे नरभक्षक, खेकडा, सारे प्रवासी घडीचे, दि. बा. मोकाशी यांच्या कथा यासारखे अनेक दर्जेदार श्राव्यानुभव यासाठी स्‍नॉवेल विख्यात आहे. ‘ती परत येईल?’ ही नवीन कलाकृती श्रोत्‍यांचे कान आणि मन तृप्त करेल यात शंकाच नाही.  

१२ मे २०१८ रोजी येथील सेनापती बापट मार्गावरील पीव्हीआर आयकॉन येथे हा ऑडिओ-शो-प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. थिएटरसारख्या बंद वातावरणात गोष्ट ऐकणे हा रसिक श्रोत्यांसाठी निश्चितच एक विलक्षण अनुभव ठरला. या ऑडिओ शोसाठी निर्माते नितीन वैद्य, अभिनेत्री चिन्मयी सुमीत, लेखिका मनस्विनी लता रवींद्र, दिग्दर्शक वरुण नार्वेकर, गायक-लेखक डॉ. आशुतोष जावडेकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. हा श्राव्यानुभव ‘स्नॉवेल’च्या संकेतस्‍थळावर आणि मोबाईल अ‍ॅपवरदेखील उपलब्ध होणार आहे.

स्नॉवेलचे संकेतस्‍थळ :
https://snovel.in
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link