Next
पुणे स्टार्टअप क्रांतीच्या उंबरठ्यावर
‘टीआयई पुणे’-‘केपीएमजी आंत्रप्रेन्युअरशीप’ अहवालाचा निष्कर्ष
प्रेस रिलीज
Wednesday, April 17, 2019 | 05:08 PM
15 0 0
Share this article:

पुणे : पुणे हे स्टार्टअप क्रांतीच्या उंबरठ्यावर असून, या क्षेत्राचा झपाट्याने विकास होत असल्याचा निष्कर्ष पुण्यामधील आंत्रप्रेन्युअरशीप अहवालातून काढण्यात आला आहे. ‘दी इंडस आंत्रप्रेन्युअर्स पुणे’ने (टीआयई) ‘केपीएमजी’शी सहयोग केला असून, ‘टायकॉन २०१९’ या स्टार्टअप्ससाठी असलेल्या दोन दिवसीय परिषदेत हा अहवाल प्रकाशित करण्यात आला.

या प्रसंगी भारतातील ‘केपीएमजी’च्या पश्‍चिम विभागाचे ऑफिस मॅनेजिंग पार्टनर प्रदीप उधास, ‘टीआयई’चे अध्यक्ष किरण देशपांडे, नॅसकॉमचे अध्यक्ष केशव मुरूगेश, कॉर्पोरेट सल्लागार आर. गोपालकृष्णन, ‘टायकॉन २०१९’चे आयोजन समितीचे अध्यक्ष विनित पटनी आणि गणेश नटराजन, हरिश मेहता, बी. व्ही. जगदीश, विश्‍वास महाजन, वंदना सक्सेना यांसारखे तज्ज्ञ उपस्थित होते. हा ६४ पानी अहवाल असून, याची प्रस्तावना ‘केपीएमजी’चे भारतातील अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अरुणकुमार व ‘केपीएमजी’च्या पश्‍चिम विभागाचे ऑफिस मॅनेजिंग पार्टनर प्रदीप उधास यांनी लिहिली आहे.

‘या अहवालानुसार शहरातील पायाभूत सुविधा, मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ, तंत्रज्ञान आणि चांगले जीवनमान यांमुळे स्टार्टअप क्षेत्राला चांगली चालना मिळत आहे; मात्र देशातील स्टार्टअप राजधानी बनायला व जागतिक पातळीवरच्या बॉस्टन, बीजिंग, सिलिकॉन व्हॅलीसारख्या स्टार्टअप हब्सशी स्पर्धा करण्यासाठी अजून काही उपाययोजना गरजेच्या आहेत; मात्र या क्षेत्रात होणारी गुंतवणूक, नवीन सादरीकरण, अधिग्रहण, मार्गदर्शन आणि अशा बर्‍याच घटकांमुळे पुण्याचा नवीन अवतार म्हणजे ‘पुणे २.०’चे स्वागत केले पाहिजे,’ असे प्रदीप उधास म्हणाले.

या अहवालानुसार ‘ईज ऑफ लिव्हिंग’च्या क्रमवारीत अव्वल स्थान असलेल्या पुण्यामध्ये २०१८च्या आकडेवारीनुसार तीन हजार २०० स्टार्टअप्स कार्यरत आहेत. आरोग्य तंत्रज्ञान, शिक्षण तंत्रज्ञान, ऑटो तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान व इतर अनेक प्रकारच्या स्टार्टअप्सचा यात समावेश आहे. भारतातील एकूण टेक स्टार्टअप्सपैकी दोन टक्के पुण्यात आहेत. २०१४ ते २०१८ (सप्टेंबर) दरम्यान पुण्याला १३२ व्यवहारांद्वारे ६९ अब्ज रूपये (एक बिलियन युएस डॉलर्स) निधी प्राप्त झाला आहे. केवळ २०१६मध्ये ४२ व्यवहार झाले होते.

पुण्यामध्ये असलेले सेंटर ऑफ एक्सलन्स, स्टार्टअप अ‍ॅक्सलरेटर्स, गुंतवणूकदार, को-वर्किंग स्पेसेस यांमुळे स्टार्टअप उद्योगांना मोठी चालना मिळाली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय विमानतळ नसणे, पुरेशा इनक्युबेटर्सचा अभाव, निधी प्राप्त करण्याची साधने व रॅपिड ट्रान्झिट मेट्रो कनेक्टिव्हिटी ही प्रमुख आव्हाने आहेत. या अहवालानुसार कौशल्यविकास व नवउद्योजकांचे प्रशिक्षण, पायाभूत व डिजिटल पायाभूत सुविधा सुधारणे आणि योग्य दिशादर्शक धोरणे व नियम गरजेचे आहेत.

सिलिकॉन व्हॅली किंवा ईस्त्राईलसारख्या जागतिक स्टार्टअप हब्सशी स्पर्धा करण्याचे सामर्थ्य पुण्यामध्ये असून, त्यासाठी नवउद्योजकतेवर भर देणे गरजेचे असल्याचे विनित पटनी म्हणाले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search