Next
अजिंक्य योद्धा बाजीराव
BOI
Tuesday, November 06, 2018 | 10:25 AM
15 0 0
Share this article:

साताऱ्याचे शाहू महाराज यांच्या दरबारातील पेशवा म्हणजे पंतप्रधान बाळाजी विश्वनाथ यांचे ज्येष्ठ पुत्र बाजीराव. लहान वयातच ते एक उत्तम लष्करी नेता व मुत्सद्दी म्हणून तयार झाले. विसाव्या वर्षांतच त्यांच्याकडे ‘पेशवे’पद सोपविण्यात आले. तेव्हापासून त्यांनी गाजवलेला पराक्रम, नेत्रदीपक व अजिंक्य कारकीर्दीचा परामर्श जयराज साळगावकर यांनी ‘अजिंक्य योद्धा बाजीराव’मधून घेतला आहे.

बाजीराव-मस्तानी संबंधावर भर न देता, पेशवेपदाच्या २० वर्षांच्या अल्प कारकिर्दीत त्यांचे अफाट शौर्य, बुद्धिमत्ता व युद्धनिपुणता हे गुण सामान्यांपर्यंत पोचविण्याच्या प्रयत्न यातून केला आहे. मराठ्यांचा इतिहास, मोगल सत्तेचे कथन करत बाजीराव यांच्या उदयापासून सुरुवात होते. बाजीराव पेशव्यांपुढे निजामाचे आव्हान होते, त्यावर प्रकाश टाकला आहे.

शिव्व्राय व बाजीरावांची युद्धनीती, कर्नाटकच्या मोहिमा, पालखेडचा संग्राम, माळवा, गुजरात, बुंदेलखंडातील कामगिरी याचा आढावा घेताना त्यांच्या सरदारांचा परिचय दिला आहे. बाजीराव बल्लाळ पेशवा यांचे कर्तृत्व व व्यक्तिमत्त्व, कर्तबगारीचा ताळेबंद, त्यांच्या चढाया, हालचाली, प्रशासन या सर्व गोष्टींचा विचार यात मांडलेला आहे.    
      
प्रकाशन : परम मित्र पब्लिकेशन
पृष्ठे : २२३
मूल्य : २२५ रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 54 Days ago
The Britsh general , Field Marsahal B . Montgomery has written a book on the subject of Warfare . Therein he has mentioned Bajirav , The Elder .
0
0

Select Language
Share Link
 
Search