Next
मोदी सरकारच्या शपथविधीवेळी रत्नागिरीत जल्लोष
BOI
Friday, May 31, 2019 | 04:12 PM
15 0 0
Share this article:

पंतप्रधानपदाची शपथ नरेंद्र मोदी यांनी घेतल्यानंतर आमदार उदय सामंत यांना लाडू भरवताना नगरसेवक उमेश कुळकर्णी आणि सचिन वहाळकर.

रत्नागिरी : फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि ‘मोदींचा विजय असो’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा जल्लोषपूर्ण वातावरणात रत्नागिरीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा साजरा करण्यात आला.

पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा विराजमान होणारे मोदी आणि भाजप सरकारमधील अन्य मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण रत्नागिरी शहर भाजप, भाजयुमोतर्फे मारुती मंदिर येथे दाखवण्यात आले. भव्य एलईडी स्क्रिनवर हा सोहळा पाहण्यासाठी या वेळी मोदीप्रेमींनी एकच गर्दी केली होती. या वेळी रत्नागिरीकरांना बुंदीचे लाडूंचे वाटपही करण्यात आले. 


मोदी दुसर्‍यांदा पंतप्रधान झाले; तसेच भाजपला २०१४च्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळाल्या. मोदी शपथ घेताना रत्नागिरीकरांना पाहता यावे यासाठी मारुती मंदिर येथे एलईडी स्क्रिन लावली होती. या स्क्रिनवर शपथविधीचा सोहळा पाहण्यासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व रत्नागिरीकरांची भरपूर गर्दी झाली होती. भाजपचे झेंडे सर्वत्र झळकल्याने वातावरण भाजपमय झाले होते. मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी व ढोल-ताशांचा गजर करण्यात आला; तसेच एक हजारांहून अधिक लाडू वाटप करण्यात आले. 

शहर भाजपतर्फे लावण्यात आलेल्या एलईडी स्क्रिनवर शपथविधी सोहळा पाहण्यासाठी उपस्थित नागरिक.

या वेळी अ‍ॅड. बाबा परुळेकर, अ‍ॅड. विलास पाटणे, अ‍ॅड. दीपक पटवर्धन, सचिन वहाळकर, भाजप-शिवसेनेचे नगरसेवक, अविनाश साटम, महेंद्र मयेकर, मंदार मयेकर, मनोज पाटणकर, सतीश शेवडे, शहर सरचिटणीस उमेश कुलकर्णी, बिपीन शिवलकर, आमदार उदय सामंत, नगराध्यक्ष बंड्या साळवी, ऐश्‍वर्या जठार, अ‍ॅड. साखळकर आदींसह अनेकजण उपस्थित होते.


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search