Next
अॅलिस वॉकर
BOI
Friday, February 09, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

आफ्रिकन अमेरिकन स्त्रियांच्या वाट्याला येणारे हाल आणि अत्याचार धिटाईने मांडणारी कृष्णवर्णीय लेखिका अॅलिस वॉकर हिचा नऊ फेब्रुवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये तिचा अल्प परिचय...
........
नऊ फेब्रुवारी १९४४ रोजी जॉर्जियामध्ये जन्मलेली अॅलिस वॉकर ही अमेरिकेची प्रसिद्ध कथाकार, कादंबरीकार, आणि कवयित्री. वयाच्या आठव्या वर्षापासून तिने लिहायला सुरुवात केली होती. तिने प्रामुख्याने आफ्रिकन अमेरिकन संस्कृतीविषयी लेखन केलंय. 

एका अॅक्सिडेंटमध्ये तिचा एक डोळा निकामी झाला होता; पण न डगमगता तिने आपल्या टाइपरायटरवर लेखन सुरूच ठेवलं. सुरुवातीचा तिचा कल कवितांकडे जास्त होता; पण पहिल्या कवितासंग्रहापाठोपाठ तिची ‘दी थर्ड लाइफ ऑफ ग्रँज कोपलंड’ कादंबरी प्रसिद्ध झाली आणि त्याच्यामागोमाग आफ्रिकन अमेरिकन स्त्रियांच्या वाट्याला येणारे हाल आणि अत्याचार मांडणारा ‘इन लव्ह अँड ट्रबल’ हा तिच्या कथांचा संग्रह प्रसिद्ध झाला आणि गाजला. 

१९७६च्या सुमारास तिची ‘मेरिडिअन’ ही सामाजिक कार्यकर्त्यांची धडपड मांडणारी कादंबरी आली. पुढे १९८२ साली तिची ‘दी कलर पर्पल’ ही कादंबरी आली आणि ती रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर गेली. एका अशिक्षित आफ्रिकन अमेरिकन बाईचा लढा सांगणाऱ्या त्या कादंबरीला पुलित्झर पारितोषिक मिळालं आणि त्यावर स्टीव्हन स्पीलबर्गने काढलेला त्याच नावाचा सिनेमाही गाजला आणि हुपी गोल्ड्बर्गने त्या रोलसाठी ऑस्करही मिळवलं.
 
दी टेम्पल ऑफ माय फमिलिअर, पझेसिंग दी सिक्रेट ऑफ जॉय, बाय दी लाइट ऑफ माय फादर्स स्माइल नाऊ इज दी टाइम टू ओपन युअर हार्ट, हे तिचं नंतरचं लेखनही प्रसिद्ध आहे.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link