Next
‘जेट एअरवेज’चा चौदा दिवसांचा सेल
प्रेस रिलीज
Thursday, April 19 | 03:56 PM
15 0 0
Share this story

मुंबई :  ‘जेट एअरवेज’ या भारतातील प्रीमिअर, परिपूर्ण सेवा देणाऱ्या आंतरराष्ट्रीय एअरलाइनने या हिवाळ्यात युरोपातील विविध ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी विमान तिकीटावर लक्षणीय सवलत जाहीर केली आहे. हा चौदा दिवसांचा सेल केवळ वन-वे किंवा परतीच्या प्रवासाचे  ‘इकॉनॉमी’ श्रेणीचे तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांना लागू असेल. भारतातून प्रवास सुरू करण्यासाठीची वैधता एक ऑक्टोबर   ते १५ डिसेंबरपर्यंत, तर भारतात परतण्यासाठीच्या    प्रवासाची वैधता १५ जानेवारीपासून आहे. 

जेट एअरवेज या एअरलाइनने  भारतातील सर्व ४५ शहरांतून युरोपातील निवडक ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना सध्याच्या सर्वात कमी भाड्यावर ३० टक्क्यांपर्यंत सवलत जाहीर केली आहे. ऑनलाईन किंवा मोबाइल अॅपवर विमानाचे तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त सामानावर आकर्षक शुल्क, झीरो कॅन्सलेशन फी व फेअर लॉक असे काही फायदे मिळतील.

जेट एअरवेजचे रेव्हेन्यू मॅनेजमेंट व नेटवर्क प्लानिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार म्हणाले,  ‘युरोप हे भारतीयांचे नेहमीच सर्वात पसंतीचे ठिकाण राहिले आहे. विशेषतः हिवाळ्यात बर्फाच्छादित सौंदर्याची भुरळ भारतीयांना पडते. एअर फ्रान्स व केएलएम रॉयल डच एअरलाइन्स या आमच्या कोडशेअर भागीदारांबरोबर प्रवास केल्याने प्रवाशांना विमानाच्या सर्वोत्तम वेळा, असंख्य पर्याय व सोय विचारात घेऊन युरोपातील आणखी एकशेसहा ठिकाणांचा विचार करता येईल.  सेलला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळेल आणि ते युरोपातल्या त्यांच्या आवडत्या ठिकाणी जाण्यासाठी या संधीचा लाभ घेतील, अशी खात्री वाटते.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link