Next
शिरोळेंनी घेतली चंदू बोर्डेंची भेट
प्रेस रिलीज
Thursday, June 28 | 12:48 PM
15 0 0
Share this story



पुणे : भारतीय जनता पक्षाच्या सध्या सुरू असलेल्या ‘संपर्क से समर्थन’ या देशव्यापी अभियानांतर्गत खासदार अनिल शिरोळे यांनी ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांची नुकतीच भेट घेतली.

या वेळी झालेल्या चर्चेत शिरोळे यांनी गेल्या चार वर्षांतील केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी विशद केली. उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता यांसह वेगवेगळ्या क्षेत्रात भाजपने मागील ४८ महिन्यांत राबविलेल्या योजना आणि सध्या सुरू असलेले प्रकल्प यांची माहिती देणारा सविस्तर अहवाल शिरोळे यांनी बोर्डे यांना भेट दिला.

शिरोळे यांनी बोर्डे यांच्याशी देशातील क्रीडाविषयक विषयांवर सविस्तर चर्चा केली. या वेळी नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, नगरसेवक उमेश गायकवाड, कॅन्टोन्मेंट भाजप अध्यक्ष जयप्रकाश पुरोहित आदी उपस्थित होते. ३० जून २०१८पर्यंत ‘संपर्क से समर्थन’ हे अभियान सुरू राहणार असून, त्या अंतर्गत शिरोळे समाजातील विविध स्तरातील मान्यवर व नागरिकांची भेट घेणार आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link