Next
‘एसएस’तर्फे लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी
BOI
Monday, February 05 | 06:22 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : अल्पावधीतच रत्नागिरीकरांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण करणाऱ्या एस. एस. कम्युनिकेशन अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने चँपियन्स ट्रॉफीअंतर्गत लाखोंची बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.

२५ शहरांतील ४०हून अधिक शोरूम आणि १५ लाखांहून संतुष्ट ग्राहकांचा वारसा जपत महाराष्ट्रातील सर्वात मोठी ‘चेन ऑफ मोबाइल स्टोअर’ ‘एस. एस. कम्युनिकेशन’ने अल्पावधीतच रत्नागिरीकरांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. मागील वर्षभरात आकर्षक सवलत संधी, हमखास भेटवस्तू, मोबाइल खरेदीवर मासिक हफ्ता याचबरोबर महाबचत दिवस अशा अनेक विविध योजना रत्नागिरीकरांसाठी देण्यात आल्या. केवळ विक्रीसाठी नवनवीन योजना न देता या योजनांमध्ये जपलेली ग्राहकांची विश्वासार्हता हेच ‘एसएस’चे खरे भांडवल आहे.

ओम साई स्पोर्ट्सतर्फे रत्नागिरी चँपियन्स ट्रॉफी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा चार ते १० फेब्रुवारी २०१८ या कालावधीत होणार असून, यंदा हे स्पर्धेचे पाचवे वर्ष आहे. या स्पर्धेदरम्यान ‘एस. एस. कम्युनिकेशन’ने दररोज एक लकी ड्रॉअंतर्गत मोबाइल जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये ‘सॅमसंग एस ८’, ‘आयफोन एसई’, ‘व्हिवो व्ही ७प्लस’ या मोठ्या किंमतीच्या मोबाइलचा समावेश आहे; तसेच लकी कुपनवर ५० रुपयांची ‘कॅशबॅक ऑफर’ही देण्यात आली आहे. ही सवलत रत्नागिरी, चिपळूण, कणकवली या ‘एस. एस. कम्युनिकेशन’च्या शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

‘जास्तीत जास्त ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन ‘एस. एस. कम्युनिकेशन’चे रत्नागिरीतील व्यवस्थापक सुशांत वडगावे यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link