Next
साईबाबा संस्थानचा दूरदर्शनवर विशेष कार्यक्रम
प्रेस रिलीज
Thursday, October 25, 2018 | 12:29 PM
15 0 0
Share this article:

शिर्डी : ‘मुंबई दूरदर्शन सहृयाद्री वाहिनीवर २६ ऑक्‍टोबर २०१८ रोजी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत थेट प्रसारित होणाऱ्या महाचर्चा कार्यक्रमात ‘श्री साईबाबा संस्‍थान शताब्‍दी महोत्‍सवी वर्ष आणि सेवा उपक्रम’ या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे,’ अशी माहिती मुंबई दूरदर्शनचे सहाय्यक संचालक जयू भाटकर यांनी दिली.

श्री साईबाबा समाधी शताब्‍दी महोत्‍सवाचा समारोप व संस्‍थानच्‍या विविध विकास प्रकल्‍पांचा भुमिपूजन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या उपस्थितीत शिर्डी येथे नुकताच पार पडला. वर्षभरात संस्‍थानने राबवलेल्‍या विविध कल्‍याणकारी व सेवाभावी कार्यक्रमांचे सिंहावलोकन साईबाबा संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे, उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, लोकमत जळगांव आवृतीचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी आणि डॉ. सुरेश नगरशेखर हे या कार्यक्रमात करणार आहेत.

या कार्यक्रमाचे पुनःप्रसारण २७ ऑक्‍टोबरला रात्री १० वाजता करण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुसकटे करणार असल्‍याचे श्री. भाटकर यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search