Next
‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी निवड
प्रेस रिलीज
Wednesday, July 11, 2018 | 04:19 PM
15 0 0
Share this story

परदेशात उच्च शिक्षणसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना ‘डीकेटीई’ संस्थेचे डायरेक्टर डॉ. पी. व्ही. कडोले, विभागप्रमुख व प्राध्यापक.

इचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाइल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स व ईटीसी विभागातील तब्बल सात विद्यार्थ्यांची अमेरिका, स्वीडन, नेदरलॅंड व जर्मनीतीलविविध तंत्रज्ञानातील नामांकित विद्यापीठांत उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे.

या विद्यार्थ्यांनी टोफेल जीआरई व आईएलटीएस ही परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे व त्या आधारे त्याची अमेरिका, नेदरलॅंड, जर्मनी व स्वीडन देशातील विद्यापीठामध्ये एमएस अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. या परीक्षेत यश मिळविण्यासाठी ‘डीकेटीई’मध्ये करिअर गाइडन्स सेलमार्फत वेळोवेळी जर्मन लँग्वेज क्लासेस, विविध तज्ञांचे लेक्चरचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांना आंतराराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रेरणा मिळली.

‘डीकेटीई’मध्ये उपलब्ध असलेली सॉफ्टवेअरस व तंत्रज्ञानाचा उपयोग या परीक्षेत यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना झाला. परदेशात उच्च शिक्षणासाठी ‘डीकेटीई’ने निर्माण केलेल्या संधीमुळे टेक्स्टाइल व इंजिनीअरिंग क्षेत्रात आपला  ठसा उमटला आहे. याअधीही ‘डीकेटीई’ने केलेल्या प्रगतीने जगभरातील अनेक संस्था, विद्यापीठांनी दखल घेऊन अमेरिका, यूरोप, द.कोरिया, अफ्रिका आदी देशातील नामांकित विद्यापीठांशी ‘डीकेटीई’चे शैक्षणिक सामंजस्य करार झाले असून, तेथे ‘डीकेटीई’चे विद्यार्थी आपली गुणवत्ता उत्तमरितीने सिद्ध करीत आहेत.

‘डीकेटीई’च्या विविध सामंजस्य करारामुळे डीकेटीईतील अनेक विद्यार्थी आर्थिक परिस्थिती नसतानाही उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे आपले स्वप्न साकार करीत आहेत. ‘डीकेटीई’चे आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट व इंडस्ट्रीजशी असलेल्या सामंजस्य करारामुळे येथील विद्यार्थ्यांसाठी जगभर शिक्षणाची सर्व दालने खुली आहेत.

टेक्स्टाइलमधून सलोनी पुरंदरे हिला कोलोरॅडो स्टेट विद्यापीठ, अमेरिका (डिझाइन अ‍ॅंड मर्चनडाइझिंग), प्रणील वोरा याला नॉर्थ कॅरिलोना स्टेट विद्यापीठ, अमेरिका (टेक्स्टाइल इंजिनीअरिंग), राजकुमार सिंकर याला सॅक्सॉन विद्यापीठ, नेदरलँड (इन्व्हावेटीव्ह टेक्स्टाइल), मेकॅनिकल विभागातील हर्षवर्धन केटकाळे याला कोलोरॅडो स्टेट विद्यापीठ, अमेरिका (इंजिनीअरिंग मॅनेजमेंट), रोहन पाटील याला टेक्निकल युनिर्व्हर्सिटी ऑफ बर्लिन, जर्मनी (एनर्जी इंजिनीअरिंग), इटीसी विभागातील राज पाटील याला रॉचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अमेरिका (टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग) व इलेक्ट्रॉनिक्स विभागातील अर्जित लागा यास उपसाला विद्यापीठ, स्वीडन (एम्बीडेड सिस्टीम इंजिनीअरिंग) विषयासाठी या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली आहे.

‘डीकेटीईतील प्राध्यापकांचे मार्गदर्शन व सर्व कुटुंबियांचे सहकार्य यामुळेच आम्ही हे यश प्राप्त करु शकलो,’ अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी या वेळी व्यक्त केली. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेच्या सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व ट्रस्टी उपस्थित होते.

या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डे. डायरेक्टर प्रा. डॉ. यू. जे. पाटील, डे. डायरेक्टर डॉ एल. एस. आडमुठे व सर्व विभागप्रमुख, करिअर गायडन्सचे डॉ जे. एम. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link