Next
नव उद्योजकांसाठी ५९ मिनिटांत कर्ज योजना
प्रेस रिलीज
Tuesday, November 06, 2018 | 03:59 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘पुण्यात केंद्र सरकारच्या लघु उद्योग आणि नव-उद्योजकांच्या सहाय्यासाठी सुरू केलेली ५९ मिनिटांत कर्ज योजना मोदी सरकारचा लघु उद्योगांना करत असलेल्या प्रोत्साहनाचा एक भाग आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले.

गणेश क्रीडा मंडळ येथे आयोजित या कार्यक्रमाला खासदार अनिल शिरोळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह बँक ऑफ महाराष्ट्रचे सरव्यवस्थापक दत्ता डोके, आयपीएसएमएचचे सहसचिव सदानंद दाते, एस. डी. लोकेश उपस्थित होते. या कार्यक्रमाचे जाहीर प्रक्षेपण बँक ऑफ महाराष्ट्राने इतर बँकांच्या सहकार्याने केले.

या योजनेमुळे व्यापार आणि उद्योगांना मोठी चालना आणि विश्वास प्राप्त होणार असल्याचे नमूद करून अहिर यांनी बँक ऑफ महाराष्ट्रने लघु उद्योजकांना केलेल्या आर्थिक मदतीचा विशेष उल्लेख केला.

बँकेचे सरव्यवस्थापक डोके यांनी या योजनेच्या पोर्टलबाबत माहिती दिली आणि त्याचे महत्त्व विशद केले. पोर्टलच्या माध्यमातून केल्या जाणार्‍या नोंदणी, सादरीकरण, अवधी आणि वैधता यांसह शासनाने घेतलेल्या पुढाकाराबाबत सविस्तर माहिती दिली; तसेच नवोद्योजकांना बँकेच्या योजना, संबंधित योजना आणि आर्थिक सहाय्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. शासनाच्या पीएमइजीपी, स्टँड अप इंडिया तसेच पीएमएमवाय योजनांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राने घेतलेल्या पुढाकाराचीही माहिती दिली. या वेळी लघु उद्योगांना केलेल्या सहाय्याची, तसेच विविध नवोद्योजकांसाठी असलेल्या योजनांच्या माहितीचे सादरीकरण करण्यात आले. या राष्ट्रीय कार्यक्रमास उत्तेजन देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने पुढाकार घेतला असून, कर्ज प्रकरणे मंजूर केली असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

‘एमएसएमईं’साठी असलेल्या योजनांची माहिती इतर बँका, तसेच डीजीएफटी, बीआयएस यांनी दिली. या योजनेचा शुभारंभ कार्यक्रम दिल्लीत विज्ञान भवन y इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी शेकडो नवोद्योजकांना त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास अनेक बँकांचे प्रतिनिधी, हितचिंतक उपस्थित होते. ८०  जिल्ह्यांमध्ये याचे थेट प्रक्षेपण झाले. 

५९ मिनिटांत कर्ज योजनेचे पोर्टल :
www.psbloansin59minutes.com
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link