Next
कथा एका अभाग्याची
BOI
Friday, August 03, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this story

आयुष्यात प्रत्येकाची एक लढाईच सुरू असते. बहुतांश वेळा ही लढाई परिस्थितीशी असते. शामसुंदर महादेव नार्वेकर यांच्या या छोटेखानी आत्मचरित्रातील नायकही असाच परिस्थितीशी लढत राहातो. कधी जिंकतो, तर कधी हरतो. नार्वेकर यांचे हे आत्मपर लेखन आहे.

मध्यमवर्गीय आयुष्यात येणारी सुख-दु:खे त्यांनी अनुभवली आहेत., तरीही प्रत्येकाचे आयुष्य वेगळेच असते. म्हणूनच हे वेगळेपण इतरांपर्यंत पोहोचविण्याची इच्छा असते. काळाच्या पडद्याआड गेलेल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करणारा पती येथे भेटतो; तसेच संकटांशी सामना करणारा माणूस त्यातून समजतो. अत्यंत मेहनतीने आणि जिद्दीने शून्यातून आयुष्य उभे केले, अनेक चढ-उतार पहिले, दुःखाचे चटके सोसले, तसे सुखही अनुभवले. या सगळ्याचे चित्र या लेखनातून उभे राहाते. आयुष्य संपताना आपल्यापाशी प्रेमाचे कोणी उरले नाही, ही खंत ते व्यक्त करतात, ती वाचकालाही चटका लावून जाते.

प्रकाशक :
संस्कार प्रकाशन
पाने : ९६
किंमत : १०० रुपये
     
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link