Next
हेन्रिक शेन्कीविक्झ, आप्पासाहेब पवार
BOI
Saturday, May 05 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘क्वो वादीस’सारखी प्रेमकथा लिहून जगभर प्रसिद्ध झालेला पोलिश कादंबरीकार हेन्रिक शेन्कीविक्झ आणि इतिहास संशोधक आप्पासाहेब पवार यांचा पाच मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
..... 
हेन्रिक शेन्कीविक्झ 

पाच मे १८४६ रोजी पोलंडमध्ये जन्मलेला हेन्रिक शेन्कीविक्झ हा पोलिश कादंबरीकार आणि पत्रकार म्हणून प्रसिद्ध होता. लेखनाची सुरुवात त्याने कथाकार म्हणून केली होती; पण पुढे त्याच्या ऐतिहासिक कादंबऱ्या चांगल्याच गाजल्या. विथ फायर अँड स्वोर्ड, दी डिल्युज, सर मायकेल अशी त्याची कादंबरी-त्रिधारा पोलंडमध्ये चांगलीच लोकप्रिय होती.

‘क्वो वादीस’ ही त्याची १८९६ सालची निरोच्या काळच्या रोममधली प्रेमकथा मांडणारी कादंबरी तर त्याची सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून गणली जाते. त्यावर अनेक वेळा सिनेमे बनले; पण ‘एमजीएम’ने रॉबर्ट टेलर, डेब्रा केर आणि पीटर यूस्टीनोव्हला घेऊन बनवलेला १९५१ सालचा सिनेमा सर्वोत्कृष्ट मानला जातो. 

शेन्कीविक्झला १९०५ सालचा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला होता.
 
१५ नोव्हेंबर १९१६ रोजी त्याचा स्वित्झर्लंडमध्ये मृत्यू झाला.
......

अप्पासाहेब गणपतराव पवार 

पाच मे १९०६ रोजी जन्मलेले आप्पासाहेब पवार हे इतिहास संशोधक म्हणून ओळखले जातात. 

त्यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिलं होतं.

ताराबाईकालीन कागदपत्रे - ४ खंड, दिशा आणि ध्यास, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

३० डिसेंबर १९८१ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link