Next
'नेटफ्लिक्स'वर उलगडणार शिवगामीचा प्रवास
वेब सीरिजच्या माध्यमातून येणार बाहुबलीचा प्रिक्वेल
BOI
Monday, August 06, 2018 | 02:44 PM
15 0 0
Share this article:

शिवगामी

२०१५मध्ये प्रदर्शित झालेला ‘बाहुबली : दी बिगिनिंग’ आणि २०१७मधील ‘बाहुबली : दी कन्क्ल्युजन’ या दोन्हीही चित्रपटांना मिळालेल्या भरघोस यशानंतर आता बाहुबलीतील बहुचर्चित माहिष्मती साम्राज्याची साम्राज्ञी राजमाता शिवगामीची कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे ही कथा मोठ्या पडद्यावर नव्हे, तर ‘नेटफ्लिक्स’वर वेब सीरिजच्या माध्यमातून उलगडणार आहे.

‘बाहुबली : बीफोर दी बिगिनिंग’ असे नाव असलेला हा बाहुबलीचा प्रिक्वेल असेल. आनंद नीलकंठन यांच्या ‘दी राइज ऑफ शिवगामी’ या कादंबरीवर आधारित ही वेब सीरिज आहे. दोन सीझनमध्ये ही सीरीज येणार असून, पहिला सीझन नऊ भागांचा असेल. शिवगामीचा सामान्य तरुणी ते माहिष्मती साम्राज्याची राजमाता असा प्रवास या प्रिक्वेलमध्ये पाहायला मिळणार आहे. शिवगामीची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार, ही सीरिज कधी प्रदर्शित होणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली नाही. 

दिग्दर्शक राजामौली दिग्दर्शित बाहुबली चित्रपटाच्या दोन्ही भागांनी देशभरात आणि देशाबाहेरही भरपूर गल्ला जमवला. मूलत: तेलुगू भाषेत असलेला हा चित्रपट नंतर मल्ल्याळम, तमिळ आणि हिंदी भाषेत डबिंग करण्यात आला. बाहुबलीच्या सुरुवातीच्या दोन भागांतून अमरेंद्र बाहुबली आणि महेंद्र बाहुबली या दोघांच्या कथा पाहायला मिळाल्या. आता शिवगामीची कथा पाहण्यास प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search