Next
पुण्यात उद्योग महोत्सवाचे आयोजन
‘इंडो-जपान बिझनेस कौन्सिल’चा पुढाकार
प्रेस रिलीज
Wednesday, October 10, 2018 | 02:55 PM
15 0 0
Share this story

पुणे : इंडो-जपान बिझनेस कौन्सिलतर्फे (आयजेबीसी) ‘कोनींची वा पुणे’ या पहिल्या-वाहिल्या उद्योग महोत्सवाचे आयोजन १७ आणि १८ नोव्हेंबर २०१८ रोजी पुण्यात केले जाणार आहे. भारत आणि जपान दरम्यान गुंतवणूक वाढवणे, उदयोगांचा प्रसार आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण करणे, हा या महोत्सवाचा उद्देश्य आहे.

आशियातील दोन कार्यक्षम लोकशाही असलेल्या, भारत आणि जपान दरम्यान उद्योग वाढीच्या दृष्टीने परस्पर संबंध दृढ व्हावेत, तसेच नाविन्यपूर्ण कल्पनांची देवाण-घेवाण होण्यासाठी उपयुक्त असा मंच या महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

‘कोनींची वा पुणे या उद्योग महोत्सवाच्या माध्यमातून जपानी कंपन्यांशी दीर्घकाळ टिकणारे संबंध निर्माण व्हावेत यासाठी ‘आयजेबीसी’ आणि पुणेकरांकडून जे प्रयत्न केले जात आहेत, त्याचे जपान सरकारला कौतुक वाटते. या महोत्सवात अधिकाधिक भारतीय तसेच जपानी कंपन्या एकत्र येतील आणि त्यातून उद्योगांसाठीच्या नव्या वाटा सापडतील, अशी मला अशा आहे,’ असे जपानचे मुंबईतील कौन्सल-जनरल र्योजी नोदा म्हणाले.

इंडो-जपान बिझनेस कौन्सिलचे अध्यक्ष श्रीकांत अत्रे म्हणाले, ‘भारत आणि जपान यांच्यातील मैत्री-संबंध फार जुने आहेत. या दोन देशातील व्यापार-संबंध दृढ होत चालले असून, सन २०१९-२० पर्यंत त्यांच्यातील परस्पर आर्थिक व्यवहार ५० अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचतील, अशी अपेक्षा आहे. ‘कोनींची वा पुणे’च्या निमित्ताने या दोन देशांमधील उद्योग, शिक्षण संस्था आणि समाजाला नवीन भागीदारी करता यावी, तसेच सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढावी यासाठी एक मंच उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.’

या महोत्सवात अनेक प्रकारच्या शैक्षणिक, संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीविषयक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल ज्यामध्ये कला प्रदर्शन, प्रत्यक्ष सांस्कृतिक सादरीकरण, साहित्य विषयक कार्यक्रम, कार्यशाळा, गोल-मेज चर्चा, प्रसिद्ध खाद्यपदार्थ आणि सांगीतिक कार्यक्रमांचा समावेश असेल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link