Next
परवडणाऱ्या घरांच्या उभारणीसाठी ‘क्रेडाई’ सक्रीय
शांतीलाल कटारिया महाराष्ट्र दौऱ्यात घेणार कामांचा आढावा
प्रेस रिलीज
Friday, January 11, 2019 | 12:41 PM
15 0 0
Share this story

पुणे : प्रधानमंत्री आवास योजना व परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी क्रेडाई महाराष्ट्र सक्रीय पाऊले उचलत आहे. मुंबई वगळता संपूर्ण राज्यात पाच लाखांहून अधिक घरांच्या निर्मितीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य क्रेडाईने समोर ठेवले आहे. याचाच आढावा घेण्यासाठी क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया राज्यातील २५ शहरांमध्ये दौरा करणार आहेत.

येत्या १२ जानेवारीला इंदापूर, बार्शी, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, १३ तारखेला बीड व नगर, १७ तारखेला सातारा, कराड, कोल्हापूर, कागल, तर १८ तारखेला सावंतवाडी, रत्नागिरी, चिपळूण असा दौरा नियोजित करण्यात आला आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र, विदर्भ भागातील दौऱ्याचे पुढील महिन्यात नियोजन करण्यात आले आहे.

२०२२पर्यंत पाच लाखांहून अधिक घरांची निर्मितीसाठी  ‘क्रेडाई’ने राज्य सरकारशी सामंजस्य करार केला आहे. यातील तीन लाखांहून अधिक घरांचे काम प्रगतीपथावर आहे. यास अल्पावधीत मूर्त रूप प्राप्त होण्याच्या उद्देशाने, प्रत्येक शहरातील कामांचा आढावा, या योजनेअंतर्गत काम करताना विकसकांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्या निवारण्यासाठी सर्वातोपरी सहकार्य करण्याच्या हेतूने कटारिया यांनी हा दौरा निश्चित केला आहे.

याविषयी बोलताना कटारिया म्हणाले, ‘रेराअंतर्गत प्रकल्पांचा नोंदणीचा आढावा घेणार असून, त्यासंबंधीच्या अडचणींविषयी मार्गदर्शन करणार आहेत. या दौऱ्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेला बळ देणाऱ्या क्रेडाई महाराष्ट्राच्या या उपक्रमात राज्य शासनाने अधिक सवलती देऊन संबंधित मंजुरीना गती द्यावी या संबंधीचा प्रस्तावही शासनास क्रेडाई महाराष्ट्र सादर करणार आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link