Next
‘मुंबईवरील नैसर्गिक संकटामध्ये राजकारण नको’
प्रेस रिलीज
Wednesday, July 11, 2018 | 02:52 PM
15 0 0
Share this story

नागपूर : ‘गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामध्ये सरकारी यंत्रणा मदत करताना कमी पडत असून, हा मुंबईकरांच्या सहनशीलतेचा अंत आहे. त्यामुळे मुंबईतील अडचणी लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पालकमंत्र्यांना मुंबईकडे रवाना करावे आणि परिस्थितीचा आढावा घेऊन लोकांना हवी ती मदत करावी’, अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पॉइंट ऑफ इन्फॉरमेशनच्या माध्यमातून सभागृहात केली.

ते म्हणाले, ‘मुंबईत प्रत्येक दिवशी अनेक दुर्घटना घडत आहेत. कधी पाऊस पडतोय, तर कधी विमान दुर्घटना घडत आहे. महापालिका कुणाची, सरकार कुणाचे हा वाद नको. सरकार म्हणून उपाययोजना व्हाव्यात. मंत्रालयात काही अधिकारी चांगले काम करतात त्यांना मदतीसाठी घ्या. महानगरपालिकेनेही ताबडतोब पाऊले उचलावी. आम्ही देखील सहकार्य करू. हे नैसर्गिक संकट आहे. यामध्ये राजकारण करायचे नाही.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link