Next
‘जेट एअरवेज’चा ‘जेटअपग्रेड’ उपक्रम
प्रेस रिलीज
Friday, April 27 | 05:19 PM
15 0 0
Share this story

मुंबई : जेट एअरवेज या भारतातील परिपूर्ण सेवा देणाऱ्या प्रीमिअर आंतरराष्ट्रीय विमान कंपनीने जेटअपग्रेड हा नवा उपक्रम दाखल केला असल्याने कंपनीच्या इकॉनॉमी व प्रीमिअर श्रेणीतील ग्राहकांना आता अधिक उत्तम इन-फ्लाइट सेवांचा लाभ घेता येणार आहे.

या उद्योगासाठी नवीन असलेल्या या उपक्रमामुळे कंपनीच्या इकॉनॉमी वा प्रीमिअर श्रेणीचे कन्फर्म्ड बुकिंग असलेल्या ग्राहकांना विमानप्रवासाचा अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी अनुक्रमे प्रीमिअर किंवा फर्स्ट क्लास श्रेणीमध्ये अपग्रेड होण्याची संधी मिळणार आहे.

अपग्रेड सुविधा मिळवण्यासाठी, इच्छुक प्रवाशांनी जेट एअरवेजच्या वेबसाइटवर ‘मॅनेज माय बुकिंग’ विभागात बोली लावावी आणि अपग्रेडसाठी जितकी रक्कम द्यायची त्यांची तयारी असेल त्यानुसार सुरुवात करावी. विमानाच्या उड्डाणाच्या किमान सात दिवस अगोदर बिडिंग सुरू होईल व उड्डाणाच्या वेळेच्या २४ तास अगोदर बंद होईल. दरम्यानच्या काळात ग्राहकांना आपल्या बोलीत बदल करता येतील किंवा ती रदद्ही करता येईल; परंतु, निश्चित वेळेमध्ये बोली स्वीकारण्यात आल्यावर त्यांना ती मागे घेता येणार नाही.

बिडिंग प्रक्रियेदरम्यान सर्व बिडर्सनी त्यांच्या क्रेडीट कार्डाचा तपशील देणे आवश्यक आहे. विजेत्या बिडरच्या कार्डालाच केवळ पैसे आकारले जातील. विजेत्या बिडरला नवे विमान तिकीट पाठवले जाईल. बाकी सर्व ग्राहकांचे मूळ बुकिंग कायम राहील. विमान कंपनी विमानाच्या उड्डाणापूर्वी सर्व प्रवाशांना बोलीबद्दल व सद्यस्थितीबदद्ल ईमेलद्वारे सूचना देईल.

जेट एअरवेजच्या नेटवर्क प्लानिंग व रेव्हेन्यू मॅनेजमेंटचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार यांनी सांगितले, “प्रवाशांना विमान प्रवासाचा उत्तम अनुभव मिळण्यासाठी गेली दोन दशके सातत्याने नावीन्य साधणाऱ्या विमान कंपनीने आपल्या इतिहासातील जेटअपग्रेड ही आणखी एक पहिलीवहिली सुविधा जाहीर केली आहे. जेटअपग्रेड या उपक्रमाने ग्राहकांना मिळणारा अनुभव याबाबत नवा बेंचमार्क आणला आहे व आमच्या दर्जेदार इन-फ्लाइट सेवांचे कौतुक करणाऱ्या ग्राहकांसाठी अधिक मूल्य निर्माण केले आहे.”

आघाडीच्या जागतिक विमान कंपन्यांबरोबर काम करणाऱ्या प्लसग्रेडच्या सहयोगाने दाखल करण्यात आलेली ‘जेटअपग्रेड’ सुविधा 65 देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय ठिकाणे या कंपनीच्या संपूर्ण नेटवर्कमध्ये, तसेच कंपनी चालवत असलेल्या सर्व विमानांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link