Next
‘सर्वोत्तम भारत घडविण्यासाठी युवा पिढीने योगदान द्यावे’
प्रेस रिलीज
Thursday, August 17, 2017 | 12:01 PM
15 0 0
Share this article:

स्वातंत्र्यदिनी ध्वजाला सलामी देताना कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. सुरेश भोसले, डॉ. नीलिमा मलिक, एस. ए. माशाळकर व अन्य मान्यवर.कराड (सातारा) : ‘स्वाभिमानी, स्वावलंबी, रचनात्मक आणि सर्वोत्तम भारत घडविण्यासाठी आजच्या विद्यार्थी-युवकांनी योगदान द्यावे,’ असे आवाहन कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.

कृष्णा अभिमत विद्यापीठात भारताचा ७१वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कुलपती डॉ. मिश्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. नीलिमा मलिक, व्यवस्थापकीय मंडळ सदस्य विनायक भोसले, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, परीक्षा नियंत्रक डॉ. रजनी गावकर, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, सहायक कुलसचिव एस. ए. माशाळकर, कृष्णा रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. अशोक क्षीरसागर, मेडिकल अॅाडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, ‘जयवंत शुगर्स’चे प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, कृष्णा सहकारी बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, ‘जयवंत शुगर्स’चे संचालक राहुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थी व सुरक्षरक्षकांकडून मानवंदना स्वीकारताना कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा. शेजारी डॉ. सुरेश भोसले व एस. ए. माशाळकर.ध्वजारोहणानंतर विद्यापीठाचे मुख्य सुरक्षा अधिकारी व्ही. वाय. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ध्वजाला सलामी देण्यात आली. कृष्णा विद्यापीठ व हॉस्पिटल, जयवंत शुगर्स साखर कारखाना येथील सुरक्षारक्षक, अग्निशामक पथक तसेच कृष्णा महाविद्यालयाचे एनसीसी पथक, सौ. ताराबाई मोहिते विद्यालय (रेठरे बु.), केसीटी कृष्णा स्कूल, छत्रपती संभाजी विद्यालय, वाठारचे कृष्णा स्कूल येथील विद्यार्थ्यांनी ध्वजाला सलामी दिली.

यानंतर बोलताना कुलपती डॉ. मिश्रा म्हणाले, ‘देशाला ७० वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाले असले, तरी आजही देशात गरिबी, भूकबळी यांसारख्या अनेक समस्या आहेत. या समस्यांच्या निर्मूलनासाठी देशात स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरू आहे. ही लढाई लढण्याची जबाबदारी आजच्या युवा पिढीने स्वीकारावी आणि सर्वोत्तम भारत घडविण्यात योगदान द्यावे.’

मेघना शिंदे व अश्विणनी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. या प्रसंगी कृष्णा वैद्यकीय विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एस. टी. मोहिते, नर्सिंग अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, दंतविज्ञान अधिष्ठाता डॉ. शशिकिरण फिजिओथेरपी अधिष्ठाता जी. वरदराजुलू, ‘अलाइड सायन्स’चे अधिष्ठाता डॉ. एस. सी. काळे, फार्मसी अधिष्ठाता डॉ. आर. सी. डोईजड, नर्सिंग डायरेक्टर डॉ. सुनीता टाटा, फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या शुभांगी शिंदे, प्राचार्या नम्रता कुलकर्णी, प्राचार्या टी. ए. म्हाते, डॉ. अरुण पाटील यांच्यासह विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमधील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कृष्णा हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी, तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search