Next
येस बँकेतर्फे ‘भीम येस पे’चे अनावरण
प्रेस रिलीज
Monday, October 30, 2017 | 06:35 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी खास बँक असलेल्या येस बँकेने ‘भीम येस पे’ सुविधा दाखल केली आहे. यात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एनपीसीआय) रूपे व्हर्च्युअल कार्ड, भारत क्यू कार्ड आणि बीबीपीएस या तीन उत्पादनांसह यूपीआय व आयएमपीएस पेमेंट सुविधांचाही समावेश करण्यात आला आहे. ‘भीम येस पे’वर एकूण ५.५ लाख नोंदणीकृत वापरकर्ते असून दोन लाखांपेक्षा जास्त वापरकर्त्यांनी पीटुबी पेमेंट्स व ऑनलाइन खरेदीसाठी यूपीआय किंवा व्हर्च्युअल कार्ड सेवा घेतलेली आहे. 

नव्या ‘भीम येस पे’चे अनावरण करताना येस बँकेचे मुख्य डिजिटल अधिकारी, रितेश पै  म्हणाले, ‘इंडियास्टॅक एपीआय आणि एनपीसीआय उत्पादने यांचे एकत्रीकरण असलेल्या ‘भीम येस पे’ हे येस बँकेच्या पेमेंट वॉलेटचे नवे रूप दाखल करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ‘भीम येस पे’ वॉलेटद्वारे आता युजर्सना वेगवेगळ्या कामांसाठी पैसे भरण्याचे विविध पर्याय मिळणार असून ही सेवा सर्वसमावेशक झाली आहे. आम्ही लवकरच फास्टटॅग सेवाही सुरू करणार आहोत, ज्यामुळे टोल पेमेंट सोपे होईल. सध्या ‘भीम येस पे’ हे अॅप्लिकेशन अँड्रॉइडवर उपलब्ध असून लवकरच आयओएससाठी उपलब्ध करण्यात येईल. रूपे व्हर्च्युअल कार्ड यामध्ये समाविष्ट केल्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या वॉलेटमधील उर्वरित रक्कम वापरून अगदी त्यांच्या डेबिट कार्डप्रमाणेच पण सोबत न बाळगताही विविध संकेतस्थळे तसेच अॅप्लिकेशन्सवर ऑनलाइन पैसे भरता येतील. भारतक्यूआरचा वापर वाढवून पॉइंट-ऑफ-सेल टर्मिनल्सची गरज नष्ट करणे हे त्याचे उद्दिष्ट असून त्याद्वारे कोणत्याही रिटेल दालनात क्यूआर कोड स्कॅन करून त्यांचे कार्ड वापरता येईल. याचा दुहेरी फायदा होतो, तो म्हणजे, ग्राहकांना त्यांचे कार्ड सोबत बाळगण्याची गरज पडत नाही आणि दुकानदारांनाही कार्डाद्वारे पैसे स्वीकारण्यासाठी पॉइंट-ऑफ-सेल मशिन्समध्ये गुंतवणूक करण्याची गरज पडत नाही.शिवाय तिसऱ्या भारत बिल पेमेंट सेवा (बीबीपीएस) केंद्रीकृत बिल पेमेंट सेवेसह ‘भीम येस पे’ वापरकर्त्यांना  त्यांच्या मोबाइल अॅपवरून सर्व बिले एकदाच थेट भरता येतील’.

‘भीम येस पे’ अॅप्लिकेशन डाउनलोडसाठी https://onelink.to/bhimyespay येथे उपलब्ध आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link