Next
‘‘बिनचेहऱ्याची माणसं’ हे समाजाच्या संवेदना मांडणारे पुस्तक’
BOI
Wednesday, May 09, 2018 | 03:04 PM
15 0 0
Share this story

अतुल कुलकर्णी यांच्या ‘बिन चेहऱ्याची माणसं’ या पुस्तकााच्या प्रकाशनप्रसंगी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, डॉ. दीपक सावंत, पृथ्वीराज चव्हाण, विजय दर्डा, राजेंद्र दर्डा, मंदार जोगळेकर अादी मान्यवर

मुंबई : ‘पत्रकार अतुल कुलकर्णी यांच्या ‘बिनचेहऱ्याची माणसं’ या पुस्तकातून समाजाच्या संवेदना प्रकट होत आहेत. ज्यातील शब्द, घटना, चित्रे आणि अक्षरेही बोलतात, असे हे अनोखे पुस्तक आहे. लेखन, चित्रकला आणि सुलेखनकला यांचा सुरेख संगम या पुस्तकात झाला आहे. शिवाय हे पुस्तक ई-बुक आणि ऑडिओ बुकच्या स्वरूपातही उपलब्ध झाल्याने मराठी साहित्यातील तो एक वेगळा प्रयोग ठरेल,’ असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सोमवारी (सात मे २०१८) काढले.

दैनिक लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांच्या ‘बिनचेहऱ्याची माणसं’ या पुस्तकाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘बिनचेहऱ्याची माणसं’ या पुस्तकाचे ई-बुक आणि ऑडिओ बुकही प्रकाशित करण्यात आले.

या वेळी व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, लोकमत माध्यम समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, लोकमत माध्यम समूहाचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा, ‘बुकगंगा डॉट कॉम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जोशी, सुलेखनकार अच्युत पालव आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या संवेदना आणि त्यांची स्पंदने टिपली आहेत. फार कमी शब्दांत मोठा आशय, संवेदना आणि भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. पुस्तकातील प्रत्येक कथेवर एक स्वतंत्र पुस्तक लिहिता येईल, इतके महत्त्वाचे विषय त्यांनी यात मांडले आहेत.’

‘मुंबई हे फार वेगळे शहर आहे. इथली पत्रकारिता, राजकारण, समाजकारण यामध्ये संवेदनशीलता अजूनही टिकून आहे. पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या पुस्तकातून याचीच प्रचिती दिली आहे. या पुस्तकात एका संवेदनशील पत्रकाराचे मन पहायला मिळते,’ असे उद्गार नितीन गडकरी यांनी काढल्याचे ‘महान्यूज’च्या वृत्तात म्हटले आहे. 

पुस्तकाचे लेखक अतुल कुलकर्णी यांनी या वेळी पुस्तक लेखनाचा आपला प्रवास सांगितला. ‘मुंबई शहरात जाती-धर्म-प्रांत यांच्या पुढे जाऊन अनेक बिनचेहऱ्याची माणसे राहतात. या लोकांचा जगण्याचा संघर्ष प्रचंड आहे. राजकारण, समाजकारण यांच्या पुढे जाऊन त्यांचे स्वत:चे असे प्रश्न असतात. आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून या लोकांचा संघर्ष आणि त्यांचे प्रश्न समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे,’ असे ते म्हणाले.

या वेळी पृथ्वीराज चव्हाण, विजय दर्डा, राजेंद्र दर्डा, मंदार जोगळेकर, प्रकाश जोशी, अच्युत पालव यांचीही भाषणे झाली.

(‘बिनचेहऱ्याची माणसं’ हे पुस्तक, त्याचे ई-बुक तसेच ऑडिओ बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link