Next
वयाच्या ९७व्या वर्षी हिमालयावर स्वारी
आजवर २९ ट्रेक केलेल्या पी. चित्रन नंबुद्रीपाद यांना शताब्दीपूर्वी करायची आहे ३०वी मोहीम
BOI
Monday, December 31, 2018 | 06:20 PM
15 1 0
Share this article:

पी. चित्रन नबुंद्रीपादत्रिशूर : केरळमधील मलप्पुरममधील पी. चित्रन नंबुद्रीपाद यांनी वयाच्या ९७व्या वर्षी आपला २९वा ट्रेक पूर्ण केला आहे आणि तोही हिमालयात... १९८६पासून हिमालयात भटकंती करत असलेले नंबुद्रीपाद यांनी आजवर केदारनाथ, बद्रीनाथ, वैष्णोदेवी अशा धार्मिक स्थळांसहित अनेक मोठे ट्रेक केले आहेत. 

२० जानेवारी १९२०मध्ये मलप्पुरम येथे जन्मलेले नंबुद्रीपाद हे सुरुवातीला साम्यवादी विचारसरणीचे होते, परंतु वयाच्या २७व्या वर्षी हृदयविकाराने त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आणि ते काहीसे अध्यात्माकडे वळाले. ते नक्कीच देवभोळे नाहीत. परंतु आजही ते महिन्यातून एकदा त्रिशूरमधील देवळांत जातात. ‘खरे तर प्रत्येक तपस्वी, विरक्त माणूस हा मला संशयास्पद वाटतो. परंतु त्यातही काही अस्सल असतील, तर मी नक्कीच त्यांच्यावर विश्वास ठेवतो,’ असे ते म्हणतात. याच प्रेरणेतून त्यांनी १९८२मध्ये हिमालयातील भटकंती सुरू केली. आपल्या कुटुंबालाही ते हिमालयात घेऊन गेले आहेत. 

नंबुद्रीपाद यांना शारीरिक स्वास्थाचे रहस्य विचारले असता, शुद्ध शाकाहारी असणे हे त्यातील एक महत्त्वाचे कारण त्यांनी सांगितले. भरपूर फळे आणि भाज्या खाणे, योगासने करणे आणि दिवसातून काही वेळ चालणे हा त्यांचा नित्यक्रम आजही असल्याचे ते सांगतात. अशी जीवनशैली सुरुवातीपासूनच ठेवल्याने आज आपण फिट आहोत, असेही ते आवर्जून सांगतात. आजवर वेगवेगळे २९ ट्रेक केलेल्या ९७ वर्षांच्या नंबुद्रीपाद यांना आपल्या वयाची शताब्दी पूर्ण होईपर्यंत ३०वा ट्रेक पूर्ण करायचा असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.  
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search