Next
‘मयूर करंडक’ स्पर्धेत एनएच- ९ संघ विजयी
प्रेस रिलीज
Monday, December 25 | 03:14 PM
15 0 0
Share this story

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर कला, क्रीडा, सांस्कृतिक विभागातर्फे कलाकारांच्या मयूर करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत एनएच- ९ संघ (हडपसर) विजेता ठरला.

कॉपरकॉईन संघ द्वितीय, तर संस्कृती महाराष्ट्राची टीम ‘ए’ हे तृतीय ठरले. संस्कृती महाराष्ट्राची टीम ‘बी’ ने चौथा क्रमांक पटकावला. स्पर्धेचे हे नववे वर्ष होते. यात १५ संघ सहभागी झाले होते. प्रथम क्रमांक विजेत्या संघाला ११ हजार व करंडक, उपविजेत्या संघाला नऊ हजार व करंडक, तृतीय क्रमांकासाठी सात हजार व करंडक, अशी बक्षीसे देण्यात आली.

रोहित पठारे ‘मॅन ऑफ द सिरीज’ ठरले. बेस्ट फिल्डर म्हणून चेतन चव्हाण, हॅटट्रीक मयूर जाधव, बेस्ट कॅच आबा सूर्यवंशी, बेस्ट बॅट्समन म्हणून रोहित गायकवाड, बेस्ट बॉलर म्हणून सागर अडागळे आणि बेस्ट कीपर म्हणून प्रकाश सुतार यांना गौरविण्यात आले.

शिवाजीनगर येथील शिवाजी उदय मंडळ मैदानात झालेल्या या क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रसिद्ध दिग्दर्शक भाऊसाहेब कुर्‍हाडे, अभिनेते सुरेश विश्वकर्मा, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, नगरसेवक नंदा लोणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी स्वागत केले. नितीन मोरे, योगेश सुपेकर यांनी प्रास्ताविक केले. इक्बाल दरबार, माणिक बजाज, डॉ. रमेश खाडे, गिरीजा प्रभू उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link