Next
हायस्पीड इंटरनेटसाठी ‘इस्रो’चे प्रयत्न
BOI
Wednesday, May 24, 2017 | 04:00 AM
15 0 0
Share this article:

नवी दिल्ली : आशियाई देशांमध्ये हाय-स्पीड अर्थात वेगवान इंटरनेटच्या सेवेत तुलनेने भारत मागे आहे; मात्र असे असले तरी लवकरच भारत वेगवान इंटरनेटच्या युगात प्रवेश करणार आहे. भारताची अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) सध्या यावर काम करत आहे. 

आगामी दीड ते दोन वर्षांच्या काळात हायस्पीड इंटरनेटच्या संदर्भात तीन दूरसंचार उपग्रह सोडण्याच्या योजनेवर ‘इस्रो’ काम करत आहे. हे तीन उपग्रह एकामागून एक प्रक्षेपित करण्याची ‘इस्रो’ची योजना आहे. सुरुवातीला जूनमध्ये जी सॅट-१९, त्यानंतर जी सॅट-११ आणि त्यानंतर जी सॅट-२० हे उपग्रह प्रक्षेपित केले जाणार आहेत. ‘यापैकी जी सॅट १९ हा उपग्रह ‘इस्रो’चे अत्याधुनिक नव्या पिढीचे प्रक्षेपण यान ‘जीएसएलव्ही मार्क थ्री’द्वारे प्रक्षेपित केला जाणार आहे. हा उपग्रह मल्टिपल स्पॉट बीमवर (हाय फ्रिक्वेन्सीवर काम करणारा एक खास ट्रान्स्पाँडर) चालेल. प्रक्षेपणानंतर संपूर्ण देश या मल्टिपल स्पॉट बीमच्या कक्षेत येईल,’ अशी माहिती ‘इस्रो’चे अध्यक्ष किरणकुमार यांनी दिली आहे. 

हे तीनही उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केल्यानंतर देशभरात असलेली हायस्पीड इंटरनेटची समस्या सुटू शकेल. यामुळे वेगवान इंटरनेट, व्हिडिओ आणि फोनची सेवा मिळू शकेल. यापैकी जी सॅट-१९ हा उपग्रह आजवरच्या जुन्या उपग्रहांच्या तुलनेत जास्त सक्षम असून, तो सेकंदाला चार गिगाबाइट डेटा देण्यास सक्षम असेल. म्हणजेच चार उपग्रहांचे काम तो एकटाच करू शकेल. अशी माहिती ‘इस्रो’तर्फे देण्यात आली आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search