Next
‘नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची आयुक्तांकडून पाहणी’
प्रेस रिलीज
Monday, June 19, 2017 | 04:59 PM
15 0 0
Share this article:

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी माजिवडा ते साकेत बाळकुम व नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची पाहणी केली.ठाणे :  माजिवडामार्गे साकेत बाळकुम, तसेच नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या नियोजित रस्त्याची महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नुकतीच पाहणी करून हा रस्ता लवकरच सुरू करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

सद्यस्थितीत माजिवड्याहून साकेत बाळकुमला जायचे असेल किंवा नाशिक महामार्गावर जायचे असेल, तर माजिवडे चौकातून जाण्याशिवाय पर्याय नाही. या पार्श्वभूमीवर माजिवडा गावामधून नागरी संशोधन केंद्राच्या समोरून थेट साकेत बाळकुम, तसेच नाशिक महामार्गावर जाण्याचा हा अतिशय चांगला पर्याय निर्माण होणार आहे. या रस्त्यासाठी नागरी संशोधन केंद्र येथील अडथळा ठरणारी इमारत यापूर्वीच महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार निष्कासित करण्यात आली असून, त्यातील रहिवाशांचे पुनर्वसनही करण्यात आले आहे. 

हा रस्ता तातडीने सुरू व्हावा यासाठी जयस्वाल यांनी रस्त्याची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्याचे आदेश शहर विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. या वेळी उपायुक्त संदीप माळवी, नगर अभियंता रतन अवसरमोल, शहर नियोजन व विकास अधिकारी प्रमोद निंबाळकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, नितीन येसुगडे आदी अधिकारी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search