Next
जर्मन फिल्ममेकर लिओना गोल्डस्टाइन पुण्यात
प्रेस रिलीज
Tuesday, November 27, 2018 | 01:41 PM
15 0 0
Share this article:

लिओना गोल्डस्टाइनपुणे : जर्मन पत्रकार आणि छायाचित्रकार असलेल्या फिल्ममेकर लिओना गोल्डस्टाइन ‘गॉड इस नॉट वर्किंग ऑन संडे’ या त्यांच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी पुण्यात येणार आहेत. या चित्रपटाचे स्क्रिनिंग २८ नोव्हेंबर २०१८ रोजी येथील मॅक्सम्युलर भवन येथे सायंकाळी सात वाजता होणार आहे.

लिओना गोल्डस्टाइन यांनी स्वतः टिपलेल्या छायाचित्रांच्या  संग्रहाचे प्रदर्शन या वेळी प्रेक्षकांसाठी खुले असणार आहे.  ‘क्लायमेट चेंज- वन ऑफ द मेन रिझन्स फॉर रेफ्युज ऑर एस्केप लिटर पोल्युशन अँड ओव्हरफिशिंग ऑफ द ओशन’, ‘प्रॉसिक्युशन अँड डिस्क्रिमिनेशन एज रिझन्स फॉर रेफ्युज ऑर एसकेप’, ‘अॅनॉनिमस मास ग्रेव्ह’ अशा विविध संवेदनशील विषयांवर हे प्रदर्शन असणार आहे. ‘लिबर्टी ऑफ मुव्हमेंट- अ युनिव्हर्सल राइट?’ नाव असलेल्या या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन लिओना यांच्या हस्ते २८ नोव्हेंबरला सायंकाळी मॅक्सम्युलर भवन येथे ‘गॉड इस नॉट वर्किंग ऑन संडे’ चित्रपट स्क्रिनिंगनंतर होणार आहे.

येथील एनजीओ हेल्पलाइफच्या सहकार्याने ‘ग्योथ- इन्स्टिट्यूट मॅक्सम्युलर भवन’ने चालू केलेल्या आउटरिचप्रोग्रॅमअंतर्गत चित्रपट स्क्रिनिंगबरोबरच, लिओना ‘स्त्री सशक्तीकरण’ या विषयावर आधारित डॉक्युमेंट्री चित्रपटदेखील बनवणार आहेत. त्याचबरोबर त्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्युमेंटरी चित्रपटाचे चित्रीकरण कसे करावे याबाबत सात दिवसांची कार्यशाळा घेणार आहेत.

स्क्रिनिंग व प्रदर्शनाविषयी :
दिवस :
बुधवार, २८ नोव्हेंबर २०१८
वेळ : सायंकाळी सात वाजता
स्थळ : मॅक्सम्युलर भवन, पुणे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search