Next
‘आयडिया’तर्फे ‘कॅशबॅक ऑफर’
प्रेस रिलीज
Tuesday, February 13 | 03:48 PM
15 0 0
Share this story

मुंबई : दुर्गम भारताशी जोडले जाऊन मोबाईल इंटरनेटचा जास्तीत जास्त प्रसार करण्याच्या मोहिमेंतर्गत आयडिया सेल्युलर कंपनीने कार्बनच्या स्मार्टफोन्स आणि फीचर फोन्सच्या व्यापक रेंजवर विशेष कॅशबॅक ऑफर जाहीर केली आहे.

ए४१ पॉवर आणि ए९ इंडियन (किंमती दोन ९९९ रुपये व तीन ९९९ रुपये अनुक्रमे) या स्मार्टफोन्सवर एक हजार ५०० रुपयांची कॅशबॅक ऑफर देण्यात येत असून, यामुळे आयडिया ग्राहकांसाठी या फोर-जी फोन्सची किंमत जवळजवळ अर्धी होणार आहे. आयडिया ग्राहकांच्या आयडिया वॉलेटमध्ये पहिल्या अठरा महिन्यांनंतर ५०० रुपये तर, ३६ महिने पूर्ण झाल्यानंतर एक हजार रुपयांचा बॅलन्स जमा करण्यात येईल. ‘आयडिया’तर्फे युवा२ (किंमत चार हजार ९९९ रुपये) या स्मार्टफोनवरही दोन हजार रुपयांची कशॅबॅक ऑफर देण्यात येणार असून, हा फोर-जी स्मार्टफोन ग्राहकांना दोन हजार ९९९ रुपयांना उपलब्ध होणार आहे. आयडिया ग्राहकांच्या आयडिया वॉलेटमध्ये पहिले १८ महिने पूर्ण झाल्यानंतर ५०० रुपये तर, ३६ महिने पूर्ण झाल्यानंतर एक हजार ५०० रुपये बॅलन्स जमा करण्यात येईल.

ए४१ पॉवर, ए९ इंडियन आणि युवा२ या स्मार्टफोन्सवर कॅशबॅक ऑफरचा लाभ घेण्यासाठी, ग्राहकांना पहिल्या १८ महिन्यांच्या कालावधीत एकूण तीन हजार रुपयांचे आणि त्यापुढील १८ महिन्यांमध्ये याच रकमेइतके रिचार्ज करावे लागेल. आयडिया ग्राहकांना १६९ रुपयांचे रिचार्ज करता येईल. यात त्यांना २८ दिवसांच्या वैधतेसह अमर्याद लोकल आणि एसटीडी कॉल्स, मोफत रोमिंग, एक जीबी प्रतिदिवस डेटा आणि १०० एसएमएस प्रतिदिन या सुविधा मिळणार आहेत.

कार्बन के३१०एन, के२४ आणि के९ जम्बो या फीचर फोन्सवर (किमत अनुक्रमे ९९९ रुपये, एक हजार १९९ रुपये आणि एक हजार ३९९ रुपये) ‘आयडिया’तर्फे प्रत्येकी एक हजार रुपये कॅशबॅक देण्यात येत आहे. यामुळे ग्राहकांना हे फोन कमी किमतीत उपलब्ध होतील. परिणामी, ३६ महिन्यांनंतर के३१० एन हा फोन ग्राहकांना मोफतच मिळणार आहे.

फीचर फोन्सवरील ५०० रुपयांच्या कॅशबॅक ऑफरचा लाभ घेण्यासाठी आयडिया ग्राहकांनी पहिल्या १८ महिन्यांत एकूण दोन हजार ७०० रुपयांचे रिचार्ज करणे आणि ऊर्वरित ५०० रुपयांच्या कॅशबॅकचा लाभ घेण्यासाठी १९ ते ३६ महिन्यांत एकूण दोन हजार ७०० रुपयांचे रिचार्ज करणे आवश्यक आहे. या ग्राहकांना विशेष १४५ रुपयांच्या रिचार्जवर अमर्यादित कॉल्स, ५०० एसएमएस, ०.५ जीबी डेटा २८ दिवसांसाठी मिळू शकणार आहे. ग्राहकांच्या मुख्य खात्यात टॉकटाईमच्या रुपात हा कॅशबॅक जमा करण्यात येणार आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना आयडिया सेल्युलरचे वरिष्ठ विपणन अधिकारी शशी शंकर म्हणाले, ‘चांगल्या दर्जाचे मोबाईल डिव्हाईस किफायतशीर किंमतीत मिळाले की ग्राहकांचा अनुभवही त्यासोबत विकसित होतो. भारतात फोर-जीचा प्रसार करण्यासाठी यामुळे चालना मिळेल, अशी आम्हाला आशा आहे. कार्बनशी भागीदारी करून स्मार्टफोन आणि फिचरफोन ग्राहकांसाठी एक आकर्षक ऑफर प्रस्तुत करताना आम्हाला आनंद होत आहे. ग्राहकांना फोर-जी तंत्रज्ञान अधिक जलद आत्मसात करता यावे, यासाठी ‘आयडिया’ची ही कॅशबॅक ऑफर फारच उपयुक्त ठरणार आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link