Next
डोक्याचे सर्व्हिसिंग
BOI
Monday, January 07, 2019 | 10:28 AM
15 0 0
Share this article:

आपल्या अवतीभोवती अनेक प्रसंग घडत असतात. त्यांकडे निखळतेने पाहत, त्यातील विनोदी अंग ओळखून सुरेशचंद्र वाघ त्यांनी त्यांचा कथांमध्ये वापर केला आहे. या कथा ‘डोक्याचे सर्व्हिसिंग’ या संग्रहातून वाचायला मिळतात.

देशात आज अनेक क्षेत्रांत भ्रष्टाचार दिसून येतो. या भ्रष्टाचाराची लागण होऊ नये यासाठी भ्रष्टाचार प्रतिबंधक लस तयार होते. ती घेण्यासाठी केंद्रावर गेल्यानंतर नायकाला आलेले अनुभव विनोदी शैलीत ‘भ्रष्टाचार प्रतिबंधक लस’मधून मांडले आहेत. पिंटूचा अभ्यास घेण्यासाठी विकत आणलेला रोबो, त्याचे शिकवणे व ऑपरेटिंग सिस्टिममध्ये बिघाड झाल्यानंतरच्या समस्या ‘रातोबाशाची शाळा’मध्ये आहेत.

आजच्या बदलत्या मार्केटिंग पद्धतीवर ‘जुनी बायको द्या नवी बायको घ्या’ यातून भाष्य केले आहे. सध्या हेल्मेट सक्तीचा विषय रोज चर्चेत आहे. या संग्रहातही ‘हेल्मेटची ऐशीतैशी’ या कथेत विनोद फुलवत प्रबोधनात्मक मांडणी केली आहे. काळा पैसा, तंत्रज्ञानने व्यापलेले जीवन, मोलकरणीची गरज, चिमण्यांची घटती संख्या रोजचे विषय कथांमधून मांडले आहेत.

पुस्तक : डोक्याचे सर्व्हिसिंग
लेखक : सुरेशचंद्र वाघ
प्रकाशक : प्रियांका प्रशांत पटवर्धन
पाने : १९२
किंमत : २२० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search