Next
‘आंतरराष्ट्रीय विश्वातील मराठी चित्रपटांचे स्थान’ विषयावर परिसंवाद
BOI
Friday, September 21, 2018 | 05:42 PM
15 0 0
Share this article:

‘आंतरराष्ट्रीय विश्वातील मराठी चित्रपटांचे स्थान’ या विषयावरील परिसंवादाबाबत माहिती देताना ‘डिव्हाईन कॉज सोशल फाउंडेशन’च्या संस्थापक अध्यक्षा प्रिती व्हिक्टर. या वेळी सुनंदा काळुस्कर, मेघराज राजेभोसले उपस्थित होते.

पुणे : ‘डिव्हाईन कॉज सोशल फाउंडेशन’ आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय विश्वातील मराठी चित्रपटांचे स्थान’ या विषयावर येत्या बुधवारी (दि. २६) एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, ज्येष्ठ तंत्रज्ञ आणि ऑस्कर पुरस्कारांचे परिक्षक उज्ज्वल निरगुडकर, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ऑस्करपर्यंत पोहोचलेल्या ‘श्वास’चे दिग्दर्शक संदीप सावंत, दिग्दर्शक व राज्याचे सांस्कृतिक सल्लागार मिलिंद लेले, अभिनेता व दिग्दर्शक नागेश भोसले सहभागी होणार आहेत’,अशी माहिती ‘डिव्हाईन कॉज सोशल फाउंडेशन’च्या संस्थापक अध्यक्षा प्रिती व्हिक्टर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी मेघराज राजेभोसले, सुनंदा काळुस्कर आणि  राज काझी उपस्थित होते. 

‘या परिसंवादासाठी भाजपा कामगार आघाडीचे अध्यक्ष संजय केणेकर,  अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले,  सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजीव पलांडे,  इम्पाचे संचालक, निर्माते विकास पाटील,   निर्माते, दिग्दर्शक अनिल काकडे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, राज काझी सूत्रसंचालन करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, विनामूल्य आहे’,असेही व्हिक्टर यांनी सांगितले.
 
या वेळी मेघराज राजेभोसले म्हणाले, ‘राष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपट गाजत आहेत. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरही मराठी चित्रपटांचा लौकिक वाढावा. यासाठी मराठी चित्रपट महामंडळ प्रयत्न करणार आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी चित्रपटांनी लौकिक प्राप्त केला आहे; मात्र ‘ऑस्कर’च्या स्पर्धेत अन्य भारतीय चित्रपटांसारखाच मराठी चित्रपट मागे पडतोय. चित्रपटांच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायात मराठी चित्रपटांना बाजारपेठ कशी मिळवता येईल?  माध्यम व्यवसायाचे बदलते स्वरूप व आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब याने मराठी चित्रपटांना जगभर पोहोचवता येऊ शकेल का? कलात्मक नावलौकिकाबरोबरच मराठी चित्रपट व्यवसायाचा आर्थिकदृष्ट्या  विकास कसा घडवता येईल? आदी विविध विषयांवर या परिसंवदामध्ये चर्चा करण्यात येणार आहे.’ 

कार्यक्रमाविषयी 
‘आंतरराष्ट्रीय विश्वातील मराठी चित्रपटांचे स्थान’ या विषयावरील परिसंवाद
स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे 
वेळ :  बुधवार, २६ सप्टेंबर, सायंकाळी ५ वाजता. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search