Next
उत्तर महाराष्ट्रात १३ कोटी जनता बजावणार मतदानाचा हक्क
BOI
Saturday, January 05, 2019 | 02:11 PM
15 0 0
Share this article:

नाशिक : ‘नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाचही जिल्ह्यांत मिळून निर्माण झालेले आठ लोकसभा मतदारसंघ आणि ४७ विधानसभा मतदारसंघात १३ कोटी ६१ लाख मतदारांची नोंदणी झाली असून, अजूनही मतदार नोंदणीचे काम सुरू आहे,’ अशी माहिती विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने यांनी दिली.

नवीन वर्षाला प्रारंभ झाल्याने २०१९ च्या निवडणुकांचे वेध सर्वांनाच लागले आहेत. विद्यमान खासदारांची मुदत मार्च महिन्यात संपत असल्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सध्या विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात बघायला मिळत आहे. मशीनवर मतदान कसे करावे याबाबत राज्य शासनाने जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेतली आहे. मतदार ओळखपत्र निर्माण करण्याची जबाबदारी ही निवडणूक शाखेमार्फत घेण्यात आलेली असून, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदार नोंदणी अभियान ही अविरत चालणारी प्रक्रिया असल्याचे विभागीय महसूल आयुक्त माने यांनी सांगितले.

मतदान हा सर्वांचा हक्क असून, प्रत्येकाला मतदान करण्याची संधी मिळाली पाहिजे यासाठी शासकीय स्तरावर पाचही जिल्ह्यांमध्ये यंत्रणा कार्यरत केली आहे. दुष्काळ आणि निवडणूक या महत्त्वाच्या दोन विभागांमध्ये सध्या विभागीय आयुक्त कार्यालयात काम सुरू आहे. पाचही जिल्ह्यांचा विचार केला, तर एकूण लोकसंख्येच्या ७० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मतदार नोंदणी झाली असून, उर्वरित ध्येय गाठण्यासाठी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात सध्या यंत्रणा अविरतपणे काम करताना दिसत आहे. उत्तर महाराष्ट्राची लोकसंख्या सध्या १९ कोटींच्या दरम्यान असून, यातील १३ कोटी ६१ लाख १९ हजार ९४० मतदार नोंदणी झाली आहे.

सध्या राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी जास्तीत जास्त मतदार नोंदणी अभियान राबवण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतीय जनता पक्षासह इतर पक्षही हक्काच्या मतदारांची नोंदणी करण्यासाठी मेहनत घेत आहेत. मार्च महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू असणार आहे.

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून विभागीय महसूल आयुक्तालय आतील विविध यंत्रणांमार्फत मतदार नोंदणी जनजागृती आणि मशीनवरील मतदानाचा विश्वास संपादन करण्यासाठी यंत्रणा काम करत आहे. यंदा मतदान झाल्यानंतर मतदान कोणाला केले याची एटीएमसारखी पावती मतदाराला पाहायला मिळणार असून, ती मतदान झाल्यावर मतदान पेटीत मतदारासमोर पडणार आहे. म्हणून मतदान यंत्रावर विश्‍वास वृद्धिंगत होईल, अशी अपेक्षा शासकीय यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

या बाबत बोलताना विभागीय महसूल आयुक्त माने म्हणाले, ‘मतदार यादी तयार करण्याचे काम सध्या परिपूर्णतेकडे आहे. येणाऱ्या निवडणुकीत रंगीत फोटोसह ओळखपत्र असणार आहे. विविध जनजागृती सध्या पाचही जिल्ह्यांत चालू असून, निवडणूक प्रक्रियेची माहिती करून घेणे ही नागरिकांची सामाजिक जबाबदारी आहे. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी शासकीय यंत्रणा काम करीत असून, आपले नाव मतदार यादीत आहे का याची खात्री करून घेणे मतदाराची सामाजिक जबाबदारी आहे. सध्या मतदार नोंदणी जनजागृती कार्यक्रम शासन मोठ्या प्रमाणावर राबवित असून, सर्व शासकीय यंत्रणांना मतदानाच्या नोंदणीसंबंधी आदेशित केले आहे.’

महसूल उपायुक्त रघुनाथ गावडे म्हणाले, ‘मतदार नोंदणी ही अविरतपणे चालणारी प्रक्रिया असून, आम्ही पाचही जिल्ह्यांमध्ये जनजागृतीवर भर देत आहोत. मतदान कसे करावे आणि मतदान केल्यानंतर एटीएमसारखी चिठ्ठी मतदाराच्या डोळ्यादेखत मतदान पेटीमध्ये कशी पडेल याचा प्रत्यक्ष डेमो आम्ही पाचही जिल्ह्यांमध्ये देत आहोत. लोकांचा मतदान यंत्रावर विश्वास बसण्यासाठी आम्ही जनजागृती करीत आहोत. उत्तर महाराष्ट्रात येणार्‍या लोकसभा मतदारसंघात सध्या मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.’

नाशिकमध्ये दोन लोकसभा आणि १५ विधानसभा मतदारसंघ आहेत. अहमदनगरमध्ये दोन लोकसभा, तर १२ विधानसभा, जळगावमध्ये दोन लोकसभा, तर ११ विधानसभा, धुळ्यात एक लोकसभा, तर पाच विधानसभा नंदुरबारमध्ये एक लोकसभा, तर चार विधानसभा, असे एकूण आठ लोकसभा आणि ४७ विधानसभा मतदारसंघ आहेत. नाशिक जिल्ह्यात चार हजार ४४६ मतदान केंद्र, असून जळगाव जिल्ह्यात तीन हजार ५३२, नंदुरबार जिल्ह्यात एक हजार ३८०, धुळ्यात एक हजार ६४५ आणि अहमदनगर जिल्ह्यात तीन हजार ७२२ अशी एकूण १४ हजार ७२५ मतदान केंद्रांची संख्या आहे. नाशिक मतदारसंघात चार कोटी ६० लाख ३९३ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. जळगाव मतदारसंघात तीन कोटी २९ लाख तीन हजार १५७, नंदुरबार एक कोटी १६ लाख, नऊ हजार ८७१, धुळे मतदारसंघात एक कोटी ५६ हजार नऊ हजार ९६४ आणि नगर तीन कोटी ३१ लाख, आठ हजार ५५५ अशा एकूण १३ कोटी ६१ लाख एक ९४० मतदारांची नोंदणी झाली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search