Next
कालेलकर पुरस्कारासाठी अर्ज पाठवा
BOI
Friday, September 14, 2018 | 03:50 PM
15 0 0
Share this article:

पुणे : मराठी  अभ्यास परिषदेतर्फे दर वर्षी  मराठीतल्या उत्कृष्ट भाषाविषयक लेखनाला पुरस्कार देण्यात येतो. या वर्षीपासून विख्यात भाषावैज्ञानिक प्रा. ना. गो. कालेलकर यांच्या नावे हा पुरस्कार देण्यात येणार आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून, त्यासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन लेखकांना करण्यात येत आहे. 

याकरता २०१६ आणि २०१७ या दोन वर्षात प्रकाशित झालेले भाषाविषयक ग्रंथ, पुस्तके, प्रबंध, संशोधनपर लिखाण, कोश, पीएचडीचे प्रकाशित, अप्रकाशित शोधनिबंध पाठविण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. पुरस्काराच्या स्पष्ट उल्लेखासह पुस्तके किंवा लिखाण निमंत्रक सलील वाघ, द्वारा, विजया चौधरी, ई -५०३, राधिका सोसायटी, सरितानगरी फेज दोनजवळ, सिंहगड रस्ता, पुणे या पत्त्यावर पाठवावीत. परिक्षक मंडळाच्या शिफारसीनुसार पुरस्कारार्थींची निवड केली जाते. असे संस्थेने पत्रकाद्वारे कळवले आहे. 

मराठी भाषकांमध्ये भाषिक सजगता निर्माण करण्यासाठी मराठी  अभ्यास परिषद १९८२ पासून कार्यरत आहे. कार्यशाळा, व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद अशा विविध माध्यमातून ही संस्था काम करते. संस्थेतर्फे ‘भाषा आणि जीवन’ हे त्रैमासिकही प्रकाशित केले जाते.  संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्र. ना. परांजपे असून, उपाध्यक्ष प्रा. डॉ. सरोजा भाटे, कार्यवाह  प्रा. आनंद काटीकर आहेत. 

प्रा. ना. गो. कालेलकर पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्यासाठी संपर्क : 
सलील वाघ : ७७९८१ ८२९१७
पत्ता : ई -५०३, राधिका सोसायटी, सरितानगरी फेज दोनजवळ, सिंहगड रस्ता, पुणे
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search