Next
ई-वाहनांच्या विविध पर्यायांवर ठाणे महापालिका आयुक्तांसमवेत तज्ज्ञांची बैठक
प्रेस रिलीज
Thursday, July 06, 2017 | 10:34 AM
15 0 0
Share this article:

ठाणे शहरात इलेक्ट्रिकल वाहनांच्या विविध पर्यायांवर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना महापालिका आयुक्त.
ठाणे : शहरामध्ये राबविण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक वाहन प्रकल्पांच्या विविध पर्यायांवर चार जुलै रोजी  महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत तज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली. या बैठकीला अतिरिक्त वाहतूक आयुक्त सहस्रबुद्धे, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी संचालक जलजारे, इलेक्ट्रिकल वाहनांचे उत्पादन करणाऱ्या राष्ट्रीय कंपन्याचे प्रतिनिधी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेचे सल्लागार आदी उपस्थित होते.

येत्या काही महिन्यांत हा प्रकल्प कार्यान्वित होणार असून, या प्रकल्पाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आकर्षक योजना राबविण्याचा निर्णय घेतानाच सुरुवातीस दुचाकी, तीन चाकी किंवा चार चाकी वाहनांच्या पर्यायावरही, तसेच शहरात विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्याबद्दल चर्चा करण्यात आली.

या बैठकीमध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या वतीने डेलॉइट या कंपनीने तयार केलेल्या सविस्तर अहवालावर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे या प्रकल्पाच्या तांत्रिक आणि कायदेविषयक बाबींवरही चर्चा करण्यात आली.

जास्तीत जास्त नागरिकांनी इलेक्ट्रीकल वाहनांचा वापर करावा यासाठी पहिल्या वर्षी चार्जिंगसाठी १०० टक्के सवलत, दुसऱ्या वर्षी ५० टक्के आणि तिसऱ्या वर्षी २५ टक्के सवलत देता येईल का, यावरही विचार करता येईल, असे या वेळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search