Next
स्वा. सावरकरांवरील ‘हे मृत्युंजय’ नाटकाचा १६ मे रोजी रत्नागिरीत प्रयोग
BOI
Wednesday, May 15, 2019 | 01:48 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
भाषाशुद्धीपासून स्वातंत्र्यलढ्यापर्यंत अनेक क्षेत्रांत अद्वितीय कामगिरी केलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या अंदमानमधील शिक्षेच्या कालावधीवर आधारित असलेल्या ‘हे मृत्युंजय’ या नाटकाचा प्रयोग १६ मे रोजी रत्नागिरीत म्हणजेच स्वातंत्र्यवीरांच्या कर्मभूमीत होणार आहे. श्री पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष अॅ ड. बाबासाहेब परुळेकर यांनी रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. 

पतितपावन मंदिराच्या आवारातील सावरकर स्मारकामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला आनंद मराठे, दलितमित्र एस. बी. खेडेकर, जयाशेठ रेडीज, कौस्तुभ सावंत, सुहास ठाकुरदेसाई उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे ‘हे मृत्युंजय’ नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. गुरुवारी (१६ मे) सायंकाळी सात वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात प्रयोग होणार आहे. सावरकरांचे विचार विद्यार्थी, युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे. नाट्यप्रयोगासाठी विनामूल्य प्रवेशिका पतितपावन मंदिर, गाडीतळावरील एम. आर. इलेक्ट्रिकल, मारुती मंदिर येथील अभिनव वस्तू आणि कुवारबाव येथील समर्थ कृपा येथे उपलब्ध आहेत; मात्र प्रवेशिका नसल्या तरी आयत्या वेळीही प्रवेश दिला जाणार आहे. नाटक पाहिल्यावर प्रेक्षकांनी स्वेच्छामूल्य म्हणून आपल्याला वाटेल तेवढी रक्कम द्यायची आहे.

या नाटकाद्वारे सावरकरांचे प्रेरणादायी विचार समोर आणण्याचे प्रयत्न राष्ट्रीय स्मारक करत आहे. या नाटकाचे आतापर्यंत ५८ प्रयोग झाले आहेत. ‘आजपर्यंत रंगमंचावर कधीही आले नव्हते असे अद्वितीय कारागृहनाट्य’ अशा शब्दांत अनेक समीक्षकांनी या नाटकाला गौरवले आहे. ‘फर्जंद’सारखा मराठी युद्धपट देणारे दिग्पाल लांजेकर यांनी या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन केले आहे. यात मालिकांतील अजिंक्य ननावरे, शार्दूल आपटे, बिपिन सुर्वे आदी लोकप्रिय कलाकारांचा सहभाग आहे. 

(‘हे मृत्युंजय’ या नाटकाविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सावरकरांची ई-बुक्स मोफत :
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्टतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या समग्र साहित्यापैकी बहुतांश पुस्तके ई-बुक स्वरूपात बुकगंगा डॉट कॉम या पोर्टलवर मोफत उपलब्ध आहेत. ती डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. बुकगंगाच्या मोबाइल अॅप्लिकेशनवरूनही ती डाउनलोड करता येतील.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Digambar About 61 Days ago
I see the photo of V D Sawarkar at Redfort Delhi...Also I read 15 sentences regarding Sawarkar....I was very proud of him .Though the sawarkar the konkani Ratnagirian..my salute to him.
0
0

Select Language
Share Link
 
Search