Next
भारतीय विद्या भवनमध्ये १६ जूनला नृत्याविष्कार
प्रेस रिलीज
Wednesday, June 13, 2018 | 11:52 AM
15 0 0
Share this article:

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत विलोभनीय भावमुद्रा, ताल आणि मुद्रा यांचा समन्वय साधणाऱ्या ‘दिशा- एक योग्य मार्ग’ या शास्त्रीय नृत्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नृत्ययात्री आर्ट मुव्हमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सादर होणार आहे.

हा कार्यक्रम शनिवारी (ता. १६) सेनापती बापट रस्त्यावरील भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे. भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.

‘नेहा आपटे आणि अंजली हरिहरन या भरतनाटयम् प्रकारातील सोलो नृत्य सादर करणार आहेत. नेहा आपटे या स्वाती दैठणकर व लावण्या अनंथ यांची शिष्या आहेत. अंजली हरिहरन या प्रमद्वारा कित्तूर व अनिता गुहा यांची शिष्या आहेत. हा कार्यक्रम सर्व रसिक प्रेकाक्षांसाठी खुला आहे,’ अशी माहिती संस्थेच्या संस्थापक-संचालक मेघना साबडे यांनी दिली.

‘नृत्ययात्री आर्ट मुव्हमेंट फाउंडेशन’विषयी :  
नृत्ययात्री आर्ट मुव्हमेंट फाउंडेशन गेल्या आठ वर्षांपासून विविध कार्यशाळा, व्याख्यान, प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शास्त्रीय नृत्याचे शिक्षण देत आहे. या कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी अनेक नृत्य गुरूंना निमंत्रित केले गेले होते. यामध्ये सी. व्ही. चंद्रशेखर (भरतनाट्यम्), ब्रागा ब्रेसेल आणि प्रियदर्शिनी गोविंद (नृत्यातील अभिनय), शमा भाटे (नृत्य दिग्दर्शन), शेजिथ कृष्ण आणि परीमल फडके (तालबद्ध नृत्यातील पैलू), जानकी रंगराजन (कर्णाचा नृत्यातील वापर), वैभव अरेकर (नृत्य रंगमंच) या गुरूंचा समावेश होता. संस्थेच्या माध्यमातून अनेकजण नृत्य शिक्षणाचा लाभ घेत आहे. नृत्याची आवड असणार्‍यांना नृत्ययात्री आर्ट मुव्हमेंट फाउंडेशन उत्तम व्यासपीठ ठरत आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
शनिवार, १६ जून २०१८
वेळ : सायंकाळी सहा वाजता
स्थळ : सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, भारतीय विद्या भवन, सेनापती बापट रोड, पुणे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search