Next
‘आतापासूनच मतदारांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न मांडा’
शरद पवार यांचे ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्ता मेळाव्यात आवाहन
प्रेस रिलीज
Friday, June 07, 2019 | 11:43 AM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘आतापासूनच मतदारांच्या घरी पोहोचा, जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवा, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही मतदाससंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचेच आमदार निवडून आले पाहिजे त्यासाठी प्रभावीपणे काम करा,’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी भोसरी एमआयडीसी येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रणनितीवर पवार यांनी पदाधिकाऱ्यांशी या वेळी संवाद साधला.

‘लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला मतदार वेगळा विचार करतात. त्यामुळे लोकसभेच्या निकालामुळे खचून जाऊ नका विधानसभेच्या तयारीला लागा. विधानसभेला जास्तीत जास्त तरुण चेहऱ्याला संधी दिली जाईल,’ असेही पवार यांनी या वेळी सांगितले. 


कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीला केवळ ९८ दिवस राहिले आहेत. त्यामुळे विधानसभेची खबरदारी तातडीने घ्यायची आहे. त्यामुळे आजपासूनच कामाला लागा. सर्वांनी एकत्र बसून जबाबदारी वाटून घ्या. त्यादृष्टीने कामाला लागा. जो प्रभाग दिला आहे. त्या प्रभागातील मतदारांची यादी तुमच्याकडे असली पाहिजे. कोण घरी आहे, कोण बाहेरगावी गेले आहेत. कोणाला भेटलात कोणाला भेटला नाहीत त्याचे टिपण करा, प्रत्येक कुटुंबाची माहिती घ्या, प्रत्येकाला वैयक्तिक भेटा, आतापासूनच घरोघरी जाऊन मतदारांना भेटल्यास मतदार ऐनवेळी आठवण काढली का असा प्रश्न उपस्थित करणार नाहीत. त्यामुळे या कामाची सुरुवात आजपासूनच करा, असे केल्यास निवडणुकीत यश येणे अशक्य नाही. याची अतिशय गरज आहे.’ 

या बैठकीला शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता सोने, आजी-माजी नगरसेवक, तसेच इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 87 Days ago
And once the elections are over ?
0
0

Select Language
Share Link
 
Search