Next
डॉ. द. ता. भोसले
BOI
Tuesday, May 08, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘आम्हास गुरुजींनी व्याकरण शिकविताना तीन काळ शिकविले. वर्तमानकाळ सोडला, तर बाकीच्या दोन्ही काळांशी आमचा संबंध येत नव्हता. शाळा पूर्ण झाली आणि आणखी एका काळाला आम्हाला सामोरे जावे लागले. तो म्हणजे ‘दुष्काळ’....’ असं सहज भिडणारं लिहून जाणारे साहित्यिक दशरथ तायापा ऊर्फ द. ता. भोसले यांचा आठ मे हा जन्मदिवस. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
.......
आठ मे १९३५ रोजी सरकोलीमध्ये (पंढरपूर) जन्मलेले दशरथ तायापा ऊर्फ द. ता. भोसले हे कथाकार आणि समीक्षक म्हणून ओळखले जातात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीशी झगडून त्यांनी शिक्षण घेतलं. एका ठिकाणी त्यांनी लिहिलं होतं, ‘आम्हास गुरुजींनी व्याकरण शिकविताना तीन काळ शिकविले. वर्तमानकाळ सोडला, तर बाकीच्या दोन्ही काळांशी आमचा संबंध येत नव्हता. शाळा पूर्ण झाली आणि आणखी एका काळाला आम्हाला सामोरे जावे लागले. तो म्हणजे ‘दुष्काळ’....’. पुढे, पुणे विद्यापीठातून ‘बीए’ला सुवर्णपदक मिळवणाऱ्या ‘दतां’नी, ‘एमए’पाठोपाठ डॉक्टरेटसुद्धा मिळवली. एक प्रभावी वक्ता म्हणूनही त्यांचं नाव आहे. 

ग्रामीण कथा, कादंबरी, समीक्षा, ललित असं विपुल लेखन त्यांनी केलं आहे. ग्रामीण जीवन, शेतकरी, मजूर, गावची संस्कृती,  तिथलं कष्टाचं जीवन, भूक आणि दारिद्र्य  हे त्यांनी प्रभावीपणे आपल्या लेखनातून समोर आणलं. ‘मी आणि माझा बाप’ ही त्यांची ग्रामीण विनोदी कादंबरी चांगलीच गाजली आणि लोकप्रिय झाली आहे.

पार आणि शिवार, पाठराखण, शब्दप्रदेशाची पाऊलवाट, अगं अगं म्हशी, आठवणीतला दिवस, ग्रामीण बोलीचा शब्दकोश, ग्रामीण साहित्य : एक चिंतन, चावडीवरचा दिवा, द. ता. भोसले यांच्या निवडक कथा, बाळमुठीतले दिवस, मनस्विनी, रा. रं. बोराडे : शिवारातला शब्द शिल्पकार, लोकसंस्कृती : स्वरूप आणि विशेष, लोकोत्तर गाडगेबाबा जीवन आणि कार्य, लोपलेल्या सुवर्णमुद्रा, शिक्षणातील अधिक-उणे, साहित्य : आस्वाद आणि अनुभव, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्र शासन, म. सा. प., दमाणी पुरस्कार, राजा शाहू शिक्षण परिषद पुरस्कार, दलितमित्र रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार अशा ३०हून अधिक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे.

(डॉ. द. ता. भोसले यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link