Next
छत्रपती संभाजी महाराज संस्कृत साहित्य
BOI
Wednesday, August 07, 2019 | 10:44 AM
15 0 0
Share this article:

शिवाजी महाराज व महाराणी सईबाईसाहेब यांचे पुत्र संभाजी महाराज हे प्रजाहितदक्ष, प्रजेविषयी कनवाळू आणि भारतीय राजनीतीचे सर्वंकष उद्गाते होते. तसेच ते संस्कृत भाषानिपुणही होते. त्यांनी ‘बुधभूषण’ या संस्कृत ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. बहुगुणसंपन्न संभाजी महाराजांनी लिहिलेले संस्कृत साहित्य व त्याचे मराठी भाषांतर ‘छत्रपती संभाजी महाराज संस्कृत साहित्य’ या ग्रंथातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचे संपादन प्रा. रामकृष्ण आनंदराव कदम यांनी केले आहे. समकालीन आणि उत्तरकालीन संस्कृत साहित्यातील संभाजी महाराजांचे वर्णन यात वाचायला मिळते. जी वर्णने समकालीन कवींनी, पंडितांनी संस्कृतमध्ये केली आहेत, तसेच जी आता भारतातील विविध भांडारात उपलब्ध आहेत, त्यांचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न यात केला आहे. याचबरोबर छत्रपती संभाजीराजे यांच्या जन्माबद्दलच्या नोंदी, संभाजी महाराजांची दानपत्रे, संभाजी महाराजांनी राजे रामसिंहास लिहिलेले पत्र, संभाजी राजेंचे जातकर्म, संभाजी महाराज विरचित दैवतस्तुती व भोसले वंशज माहात्म्य आदी अनेक गोष्टींचा ऐतिहासिक संदर्भासहित आणि मराठी व इंग्रजी भाषांतरासहित या पुस्तकात समावेश आहे. 

पुस्तक : छत्रपती संभाजी महाराज संस्कृत साहित्य
संपादक : प्रा. रामकृष्ण आनंदराव कदम
प्रकाशक : मराठीदेशा फाउंडेशन, कोल्हापूर
पृष्ठे : २२८
मूल्य : ३५० रुपये

(‘छत्रपती संभाजी महाराज संस्कृत साहित्य’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.) 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 12 Days ago
Are copies of the book available in the library of Anandashram In Pune ? In the library of the Deccan College , Pune ?
0
0
BDGramopadhye About 12 Days ago
He lived for only 32/- years , 9/- of them strggling against Aurangazeb . He was on the move all the time . He had to be . How could he have spared the leisure not only to learn but to write in Sanskrit ?
0
0
BDGramopadhye About 13 Days ago
He had a very hectic , short life . Yet he msnaged not only to read , but to write a book in a difficult language like Sanskrit !
0
0

Select Language
Share Link
 
Search