Next
‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी
BOI
Wednesday, June 05, 2019 | 04:00 PM
15 0 1
Share this article:

मुंबई : आपल्या ‘एक इंडिया हॅप्पीवाला’ या सीएसआरअंतर्गत काम करताना सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाने (एसपीएन) आणखी एक पाऊल उचलले असून, महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये पोहोचून पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. 

या प्रकल्पाचा भाग म्हणून ‘एसपीएन’ महाराष्ट्रातील १८० पेक्षा अधिक दुष्काळग्रस्त गावांपर्यंत पोहोचली. पाण्याचे टँकर्स महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील १८० गावांमध्ये ८५ हजारपेक्षा अधिक लोकांपर्यंत सुरक्षित पिण्याच्या पुरवठ्यासाठी पोहोचवण्यात आले. या उपक्रमासोबत ‘एसपीए’ने प्रत्येक दुष्काळग्रस्त गावाला सुमारे १२ हजार लिटर पिण्याचे पाणी पुरवले. हा प्रकल्प लातूर, वर्धा, अमरावती, धुळे, जालना, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आला.

‘एसपीएन’ने कायमच समाजाचे सबलीकरण करण्यावर आणि पर्यावरणावर सकारात्मक परिणाम घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. हा उपक्रम म्हणजे शाश्वत पर्यावरणाच्या निर्मितीच्या दृष्टीने उचललेल्या पावलांपैकी एक आहे. 

या विषयी बोलताना ‘एसपीएन’चे प्रमुख सीएसआर राजकुमार बिडवाटका म्हणाले, ‘सोनी पिक्चर्स नेटवर्क्समध्ये आम्ही सातत्याने आमच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रोग्रामद्वारे अधिक चांगल्या समाजाच्या निर्मितीवर भर देत आहोत. या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट लोकांसाठी पाण्यासारख्या अत्यावश्यक गरजांचे स्त्रोत निर्माण करून अधिक चांगले जीवन देण्यात योगदान देण्याचे आहे. हा उपक्रम शाश्वत समाजाप्रति सहकार्य आणि उभारणीतील मदतीच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.’
 
15 0 1
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 68 Days ago
If only they spend the money on local a, small -scale enterprises like digging lakes , trenches . Local people will provide the labour -- after all they are the ones who will get the benefits . Party politics is not likely to enter the activity .
0
0

Select Language
Share Link
 
Search